Kas Dam Overflow sakal
सातारा

Kas Dam : खुशखबर... कास धरण ओव्‍हरफ्‍लो; लोणावळ्याच्‍या भुशी डॅमचा येत आहे फील

सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम विभागात असणाऱ्या कास परिसरात गेले सात- आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

कास - सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम विभागात असणाऱ्या कास परिसरात गेले सात- आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्‍यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता सांडव्यावरून पाणी ओव्‍हरफ्‍लो होऊन वाहू लागल्‍याने येथे लोणावळ्याच्‍या भुशी डॅमचा फील येत आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवण्‍याचे काम गतवर्षी पूर्ण झाले; परंतु गतवर्षी पर्जन्‍यमानच कमी झाले होते. आता यावर्षी कास धरण परिसरात गेल्‍या सात- आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठे ओढे, नाले ओसंडून वाहत राहिल्‍याने कास धरणही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली असून, कास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या परिसरात पर्यटकांची सुद्धा वर्दळ वाढली आहे.

शहराच्या पश्‍चिमेस कास धरणात मॉन्सूनपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस ४५ फूट पाणीसाठा शिल्लक होता. त्‍यानंतर परिसरात मॉन्सूनची जोरदार हजेरी लागल्‍याने मागील पंधरवड्यात पाणी पातळीत एकूण पाच फुटाने वाढ झाली होती.

मागील वर्षी जानेवारी महिन्यात सांडव्याची उंची अधिक वाढवून पावसाळ्यात एकंदरीत ७८.७२० फूट पाणीसाठा धरणात होणार होता; पण प्रत्‍यक्षात मागील पावसाळ्यात ६१.०४८ फूट पाणीसाठा झाला होता. त्यापैकी पावणेअठरा फूट पाणीसाठा मृत आहे. यंदा मात्र मुसळधार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, वर्षभराची चिंता मिटण्‍याबरोबरच पाणी कपातीचे संकटही टळणार आहे.

वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळणार

भारतातील सर्वांत उंच धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांबवली- वजराई धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा मुख्य स्रोत कास तलावच असल्याने वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे धबधब्याचा विहंगम नजारा पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

सातारा शहराजवळच कास धरण असल्याने आम्ही सतत या परिसरात येत असतो. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच कास सांडव्यावरून वाहणारे पाणी आणि त्या ठिकाणी पायऱ्या बांधल्यामुळे एक वेगळाच आनंद मनाला मिळत आहे. लोणावळ्याच्या भुशी डॅमपेक्षाही सातारच्या कासच्या पाण्याचा नजराणा सुंदर आहे.

- सचिन साळुंखे, पर्यटक, नागठाणे (ता. सातारा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT