सातारा - सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले असून, सद्यःस्थितीत त्याठिकाणच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. धरणात सध्या ४८ फूट इतका पाणीसाठा असून, भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी पूर्ण क्षमतेने अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा होणार आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम पालिकेच्या मार्फत सध्या सुरू आहे. सद्यःस्थितीत या भिंतीचे काम अखेरच्या टप्प्यात असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा होणार आहे. गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ कास परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, त्याठिकाणच्या सांडव्या पातळीपर्यंत पाणीसाठा झाला आहे.
बांधण्यात येणाऱ्या भिंतीचे ५० फूट उंच बांधकाम झाले असून, धरणात आजमितीला ४८ फूट इतका पाणीसाठा झाला आहे. सांडव्याची उंचीइतका पाणीसाठा झाल्याने त्याठिकाणाहून पाणी ओसंडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण होण्यास अजून काही दिवस लागणार असून, त्यानंतर पुढील पावसाळ्यात याठिकाणी पूर्ण क्षमतेने अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा होणार आहे. पावसामुळे पाणी गढूळ झाले असून, नागरिकांनी ते गाळून, उकळून पिण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अभियंता शहाजी वाठारे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.