Home esakal
सातारा

फ्लॅट/प्लॉट घेताना कोणती काळजी घ्याल? खरेदी करताना 'या' गोष्टी तपासाच!

सध्या एखादी जागा अथवा घर खरेदी करणे फारच जिकरीचे बनले आहे.

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्या एखादी जागा अथवा घर खरेदी करणे फारच जिकरीचे बनले आहे. कारण, घर खरेदी करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे, त्यामुळे सामान्यांना ही फसवणूक न परवडणारीच आहे. आज सामान्य माणसाला जागा घेऊन घर बांधणे खूपच त्रासदायक झालेले आहे. त्यापेक्षा त्याला फ्लॅट घेणे सोयीस्कर वाटायला लागलेले आहे. त्यासाठी त्याला त्याच्या भागातील अनेक स्किमवर अवलंबून रहावे लागते. अशा वेळी मोठ-मोठ्या इमारतींचे आकर्षक फोटो, स्वीमिंग पूल, दवाखाना, बगिचा, अशा मोफत गोष्टींची खैरात असलेल्या चित्तवेधक जाहिराती बिल्डर करतात. त्यामुळे फ्लॅट घेताना ग्राहकांनी खूपच काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

स्वतःचे घर, फ्लॅट आयुष्यात एकदाच होतो. फ्लॅटच्या व्यवहारामध्ये फ्लॅटधारकाबरोबर इतर महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश असतो. जागेचा मालक, प्रवर्तक, बिल्डर आणि त्यातील फ्लॅट घेणारा हा फ्लॅटधारक यामध्ये आणखी एकाचा समावेश असतो, ती व्यक्ती म्हणजे जमिन मालकाचा मुखत्यार म्हणजे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर. आज बऱ्याच वेळा घर अथवा जमिन खरेदी करताना फसवणूक झालेली पहायला मिळते, त्यामुळे याचा सर्वसामान्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे अशाप्रकारचे व्यवहार करताना काळजी घेणे फारच महत्वाचे आहे.

स्वतःच्या मालकीचे घर हवे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करताना गरजेच्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. जागांच्या वाढलेल्या किमतीमुळे कागदपत्रांतील एखादी चूकसुद्धा जागेच्या स्वप्नावर पाणी टाकू शकते. एक एकर जागा व त्यामध्ये प्रशस्त बंगला, ज्याला आपण फार्म हाउस म्हणतो असे घर म्हणजे अगदी परिपूर्ण निवास; परंतु अगदी थोड्या जणांनाच हे शक्य असते. परंतु, जागेच्या किमतीमध्ये गेल्या 30 वर्षांत झालेल्या वाढीमुळे प्रथम 5 ते 10 गुंठ्यांतील बंगले झाले. तेही ज्यांना परवडत नाही त्यांनी प्लींथ लेआऊट, रो-हाउस किंवा ओनरशिप फ्लॅटमध्ये समाधान मानले. कसेही असले तरी 'स्वतः:च्या मालकीचे घर असावे' अशी प्रत्येकाची मनापासून इच्छा असतेच. परंतु, घर मिळविणे हेही काम सध्या सोपे राहिले नाही. त्यात काही जणांना वाईट अनुभवही येऊ शकतात. असे होऊ नये म्हणून काय करणे आवश्यक आहे, हे प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे झाले आहे.

फ्लॅट घेताना कोणती काळजी घ्याल?

  1. ज्या प्लॉटवर इमारत बांधण्यात येणार आहेत, त्याचा ७/१२ उतारा अगर प्रॉपर्टी कार्ड अगर बी फॉर्म यावर धारक म्हणून नावे असलेल्या सर्व व्यक्तींनी, विकसकास कुलमुखत्यारपत्र दिले आहे का, हे पाहावे.

  2. कुलमुखत्यारपत्र रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.

  3. वकिलांनी या जागेचा सर्च घेतला आहे का, व सर्च रिपोर्ट तपासावा.

  4. विकसकास दिलेले अधिकारपत्र पाहावे.

  5. प्लॉटचे पूर्ण अधिकार/ पार्ट अधिकार आहेत का, ते तपासावे.

  6. जागा विकसकाच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे का, हे पाहावे.

  7. बांधकामाचे नकाशे महापालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले आहेत का, हे पाहावे.

  8. मान्य नकाशामध्ये विकत घेण्यात येणारा फ्लॅट आहे का, हे पाहावे.

  9. फ्लॅटचा मजला व क्रमांक यांची खात्री करावी.

  10. विभागणी केलेला फ्लॅट नाही ना याची खात्री करावी.

  11. एन.ए. परवानगी घेतली आहे का, हे पाहावे. गावठाणास आवश्यक नाही.

  12. फ्लॅट विक्रीस बंधने आहेत का, हे पाहावे.

  13. यू.एल.सी. ऑर्डर असल्यास व त्यावरील अटी तपासाव्यात.

  14. मान्य नकाशातील अटी तपासाव्यात.

करारनामा करण्यापूर्वीची जबाबदारी

  • करारनाम्याचा मसुदा मागवून घ्यावा व त्याचा अभ्यास करावा.

  • टेक्निमकल व लीगल माहिती असणाऱ्यांकडून सल्ला घ्यावा. तपासून घ्यावे.

  • फ्लॅटच्या क्षेत्राचा कार्पेटमध्ये उल्लेख हवा.

  • ओपन प्रायव्हेट टेरेस क्षेत्राचा वेगळा उल्लेख हवा.

  • ताब्याची मुदत/ तारीख करारनाम्यात हवी.

  • उशीर झाल्यास नुकसानभरपाईचा उल्लेख हवा.

  • मेंटेनन्स खर्च एक रकमी, की दर वर्षी द्यायचा याची माहिती घ्यावी.

  • करारनामा रजिस्टर्ड करावा.

ताबा घेताना घ्यावयाची काळजी

  1. महापालिका हद्दीत असल्यास भोगवटा पत्र हवे. भोगवटापत्र नसताना ताबा घेणे बेकायदेशीर नाही; परंतु जागेचा वापर सुरू करणे बेकायदेशीर ठरेल व तसा वापर चालू केल्यास मनपाकडे तडजोड फी भरावी लागते. गरज वाटल्यास ती कोणी भरावयाची हे स्पष्ट ठरवून घ्यावे.

  2. मनपा करआकारणी झाली आहे, की नाही याची खात्री करावी.

  3. जमीन व इमारतीचे खरेदीखत केव्हा होणार, याबाबत विकसकाकडून हमी घ्यावी.

  4. सोसायटी होणार, की अपार्टमेंट होणार याची माहिती घ्यावी.

  5. प्रत्यक्ष खरेदीखत होईपर्यंत मेंटेनन्स कोण करणार याची माहिती घ्यावी.

  6. क्लब हाऊसच्या चार्जेसबाबत माहिती घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT