सातारा

Video : जावळीतील 'हा' प्रश्न सुटण्यासाठी दहा वर्ष ग्रामस्थ झटताहेत

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : केळघर ते डांगरेघर दरम्यान वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यावर दरड कोसळल्याने डांगरेघर येथील ग्रामस्थांचा केळघर बाजारपेठेशी असणारा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. परिसरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस पडत आहे.

सातारकरांनाे... कुटुंबाचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी हे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह

जून ,जुलै महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने प्रमुख नदी असलेली वेण्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीच्या पाण्यातील प्रवाह वाढला आहे. नदीचे पाणी डांगरेघर-केळघर रस्त्यावरील दरीवर आदळून दरड कोसळली आहे. गेल्या दहा वर्षांपासून या दरीलगत संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी डांगरेघर ग्रामस्थ करत आहेत. मात्र याकडे लक्ष न दिले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारी पहाटे या भागात दरड कोसळली आहे.

मिलिटरी अपशिंगे, पुस्तकांचं भिलार माहितीच असेल, मग जाणून घ्या टॅक्सीचं गाव

या क्‍लबचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिली 12 हजार फळझाडे दत्तक

ही दरड पडल्याने डांगरेघर-केळघर रस्ता वाहतुकीस सध्या बंद करण्यात आला असून पावसाचे प्रमाण राहिल्यास रस्ता पूर्णपणे खचून दळणवळणाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी संदीप ढाकणे यांनी केला आहे. 

टॅबचं वाटप करणाऱ्या मुंबई पालिकेच्या शाळेचेच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होण्याची भीती असून डांगरेघर ग्रामस्थांचा केळघरशी संपर्क तुटणार आहे. त्यामुळे येथे संरक्षण भिंत बांधण्यात यावी. अशी मागणी सखाराम बुवा सुर्वे, पोलीस पाटील बाजीराव सुर्वे यांच्यासह डांगरेघर ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT