खंडाळा - पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दोन्ही बाजुने आज सकाळ पासुन वहातुक कोंडी मुळे प्रचंड मनस्ताप चा सामना वाहनधारकांना करावा लागला . आज सकाळी सात वाजल्यापासून या घाटात कासव गतीने वहातुक सुरु आहे . वहातुक पोलीस व खंडाळा पोलीस सकाळ पासुन पहारा देत आहे .
याबाबत माहिती अशी कि, सलग सुट्याकडे महामार्गावर वाहनांची मोठी संख्या आहे . परिणामी सकाळी घाट मार्गात वाहनांची गती कमी करावी लागली . यातच टूक व जड वाहने रस्त्यावर असल्याने वहातुक कोंडी होतच गेली . परिणामी पोलिसांनी मोठी जड वाहने घाट पायथ्याला थांबविली .
दरम्यान खंबाटकी घाटमार्गे वहातुक पाहुन अनेकांनी कॅनॉल वरून बोगद्यामार्गे उलट दिशिने वहातुक वळविली . यामुळे सकाळी १० वाजता पुण्याबाजुकडे जाणारी वहातुक ही खोळंबली . याप्रकारे दोन्ही बाजुने हा घाट जाम राहिला .
खंबाटकी घाटातुन सातारा बाजुकडे जाणाऱ्या गाड्या हे अधिक काळ चालुच राहिल्याने गाड्या गरम झाल्या . यामुळे घाटात या गाड्या बाजुला करण्यात आले . या गाड्या लावण्यासाठी जागाही अपुरी पडत होती . इतक्या गरम गाड्या होऊन बाजुला करण्यात आल्या होत्या . दरम्यान एक ट्रक ही घाटात बंद पडला आहे .
तर बोगदया मार्गे पुण्याला जाणारा रस्ता ही जाम होता . यावेळी एस कॉर्नर वर ट्रक ला दोन गाड्या घासल्या . तसेच या रस्त्याचे काम सुरु असल्याने जागोजागी बॅरिकेटस असत्याने वाहनांची कोंडी अधिक प्रमाण झाली .
तरी पुण्याकडुन येणारी वहातुक लोणंद मार्गे वळवुन या रस्त्यावरील वाहने कमी करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.