Kisan Veer Factory Election bjp ncp shiv sena Madan Bhosale Makrand Patil satara sakal
सातारा

किसन वीर कारखाना निवडणूक : मदनदादांची तयारी; मकरंदआबांचा शड्डू?

शिवसेनेकडून जुळवाजुळव; राष्ट्रवादी द्विधा मनःस्थितीत

सकाळ वृत्तसेवा

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या रणांगणात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना उतरणार आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांच्या पॅनेलविरोधात समविचारींची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी राष्ट्रवादीला या निवडणुकीत उतरावे लागणार आहे. कारखाना ताब्यात घ्या, बाकीचे नंतर बघू, असा सल्लाही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. त्यामुळे मागील वेळेसारखे राष्ट्रवादीचे नेते रणांगणातून मागे हटणार की, मदन भोसलेंच्या पॅनेलविरोधात शड्डू ठोकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुईंजच्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता या रणांगणात कोण-कोण उतरून शड्डू ठोकणार, याविषयी उत्सुकता आहे. सध्या तरी माजी आमदार मदन भोसले यांच्याकडून पॅनेल टाकले जाणार, हे निश्चित आहे. पण, कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने तो ताब्यात घेऊन चालविणे तशी तारेवरची कसरत ठरणार आहे. ही कसरत करण्यास राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील सध्या तरी तयार दिसत नाहीत. पण, दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रमुख नेत्यांसोबतच्या बैठकीत झालेल्या चर्चेत कोणताही निर्णय झालेला नाही. सर्व जण व्दिधा मनःस्थितीत आहेत. दुसरीकडे मदन भोसले यांनी रणांगणात उतरण्याचा निश्चय केला आहे.

शिवसेनेकडून चाचपणी

शिवसेनेनेही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. समविचारी आणि सभासद व शेतकऱ्यांची प्रलंबित देणी कशी देणार, कारखाना सुरू करताना कर्जाची परतफेड कशी करणार, यांसह पाच ते सहा मुद्द्यांवर योग्य निर्णय देणाऱ्यांसोबत जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी शिवसेनेच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी चाचपणी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने काही जागा लढवल्या होत्या. काही शेतकरी सभासदही कारखान्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते.

राष्ट्रवादीची भूमिका महत्त्‍वाची

यावेळेस ‘किसन वीर’च्या कामगारांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रलंबित देणी देणारा आणि कारखाना पुन्हा सुरू करणाऱ्यांची आवश्यकता आहे. यासाठी सध्या ‘किसन वीर’चे पाच तालुक्यांतील

सभासद चांगल्या पर्यायाची वाट पाहात आहेत. हा सक्षम पर्याय राष्ट्रवादीच देऊ शकते. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांना काहीही करून या निवडणुकीत उतरावे लागणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कारखाना ताब्यात आल्यानंतर कारखाना पुन्हा सुरू कसा करता येईल, कामगार व शेतकऱ्यांची देणी तसेच थकीत देणी कशी देता येतील, याचा विचार राष्ट्रवादीचे राज्यस्तरावरील नेते करणार आहेत. त्यामुळे खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आमदार पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

मदन भोसलेंना भाजपचे पाठबळ

सध्या मदन भोसले हे भाजपमध्ये असून त्यांना खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मदत मिळाली तर त्यांना ही निवडणूक सोपी होणार आहे. पण, त्यासाठी त्यांना शेतकरी सभासदांना विश्वास देऊन पुन्हा कारखाना सुरू करण्यासह देणी परत करण्याची ग्वाही द्यावी लागणार आहे.

महाविकास आघाडीतून लढणार?

किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्मुला वापरला तर ही निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेला सोपी होईल. तसेच त्यांना पुढील काळात कारखाना कर्जासह इतर आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एकमेकांचे सहकार्यही मिळू शकणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून या तीन पक्षांतील जिल्ह्यातील नेते एकत्र येणार काय, हेही पाहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT