संस्थेचे सभासद आप्पासाहेब देशमुख यांनी याबाबतची फिर्याद वडूज पोलिसांत दिली होती.
मायणी (सातारा) : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोल्हापूरच्या (Kolhapur) धर्मादाय आयुक्तांकडे (Kolhapur Charity Commissioner) येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीची (Chhatrapati Shivaji Education Society) स्थावर मालमत्ता नोंदवण्यासाठी आवश्यक असणारी बनावट नोटीस एका दैनिकात छापून धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा संस्थेचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यासह सचिव सोनिया जयकुमार गोरे, खजिनदार अरुण दादासाहेब गोरे, सदस्या शैलेजा अशोक साळुंखे, स्मिता विरेंद्र कदम, सदस्य महंमद फारुक खान या सहा जणांवर दाखल करण्यात आला आहे.
स्थेचे आजीवन सभासद आप्पासाहेब रामचंद्र देशमुख (रा. मायणी) यांनी त्याबाबतची फिर्याद वडूज पोलिसांत (Vaduj Police) दिली. संस्थेचे अध्यक्ष आमदार गोरे, सचिव सोनिया गोरे, अरुण गोरे यांनी बेकायदेशीर ठराव करून नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आणले असून, त्याचा वाद धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट आहे. १६ ऑगस्ट २०१९ रोजी संस्थेचे अध्यक्ष आमदार गोरे यांच्यासह सहा जणांनी संस्थेच्या मालकीच्या जमीन मिळकतीची नोंद धर्मादाय कार्यालयात पीटीआर उताऱ्यास करून संस्थेस उतारा मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला. संस्थेच्या मायणीतील स्थावर मिळकती सचिव गोरे यांनी ५ जून २०२० रोजी बक्षीस पत्रान्वये छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे नावे बक्षीसपत्र करून घेतली होती. आमदार गोरे, सौ. गोरे, अरुण गोरे, शैलजा साळुंखे, स्मिता कदम, महंमद खान यांनी आपापसांत संगनमत करून संस्थेच्या सभासदांना अंधारात ठेवून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मिळकतीची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मालमत्तेसंबंधीची जाहीर नोटीस एका दैनिकात १२ जुलै रोजी प्रसिध्द केली.
१३ जुलैला तो बनावट अंक धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला. मात्र, सादर केलेली नोटीस फिर्यादी देशमुख यांना त्याच वृत्तपत्राच्या अन्य अंकात कुठेही आढळून आली नाही. नियमितचा अंक व नोटिशीच्या अंकातील मजकुरात भिन्नता आढळली. त्याबाबत दैनिकाच्या संपादकांशी खुलासा मागविल्यानंतर तो अंक आम्ही छापलेला नाही, असा त्यांनी लेखी खुलासा केला आहे. संशयितांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संस्थेस पी. टी.आर. उतारा मिळण्याबाबत सर्व प्रकारचे कामकाज करणेसाठी अरुण गोरे यांची निवड करून मिळकतीची विल्हेवाट लावणे, मिळकतींवर कर्ज प्रकरणाचा आर्थिक बोजा चढवून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट अंक प्रसिध्द करून फसवणूक केल्याचे श्री. देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.