Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil esakal
सातारा

Kolhapur NCP Sabha : उपमुख्यमंत्रिपदी विराजमानानंतर अजितदादा पहिल्यांदाच बालेकिल्‍ल्‍यात; कोण-कोण लागणार गळाला?

पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवार हे सातारा जिल्ह्याच्या आणि कऱ्हाडच्या (Karad) दौऱ्यावर येत आहेत.

हेमंत पवार

अजित पवार यांच्या बाजूने असलेल्या आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून सवता सुभा मांडत अजित पवार (Ajit Pawar) हे शिवसेना-भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवार हे सातारा जिल्ह्याच्या आणि कऱ्हाडच्या (Karad) दौऱ्यावर येत आहेत.

थोरल्या पवारांचा गड असणाऱ्या या बालेकिल्‍ल्‍यातील सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील आणखी कोण-कोण नेते सामील होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे गट-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन ते थेट उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. आमच्यासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आहेत, असा दावा अजित पवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचे सांगितले.

तसेच पक्षाचा नियम मोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सूतोवाच केले. अजित पवार यांच्या बाजूने असलेल्या आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे धाकले पवार यांच्याबरोबर काही ठराविक जण सोडले तर कोण-कोण नेते आहेत, हे अद्यापही उघडपणे स्पष्ट झालेले नाही.

उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर कोल्हापूर येथील उत्तरदायित्व जाहीर सभेत अजित पवार हे आज पुण्यातून जाणार आहेत. त्याचदरम्यान ते सातारामार्गे कऱ्हाड येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच मानला जातो.

या बालेकिल्ल्यात अजूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दबदबा कायम आहे. पक्षातील बंडोखोरीनंतर त्यांना पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी येऊन एल्गार करत नव्या ताकदीने पक्षवाढीच्या कामास लागल्याचे जाहीर केले होते. त्यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजितदादा हे येत आहेत.

त्यांच्या स्वागताची त्यांच्यासोबत पहिल्यापासून असलेले रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जोरदार तयारी केली आहे. अजितदादांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्ह्यासह तालुक्यातील शरद पवार गटातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कोण-कोण नेते मंडळी जाणार याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. त्यासाठीचे घोडामैदान दूर नसून केवळ काही तासांतच ते स्पष्ट होणार आहे.

कऱ्हाडला वाठारकर, उंडाळकर पहिले समर्थक?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात सातारा जिल्ह्यातून रामराजे नाईक-निंबाळकर आमदार मकरंद पाटील आणि राजेश पाटील-वाठारकर यांची नावे जिल्ह्यातील संपर्कासाठी देण्यात आली आहेत. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातून वाठारकर हे पहिलेच दादांचे समर्थक म्हणून त्यांच्या गोटात गेल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवार यांच्या स्वागताच्या फ्लेक्सवर आनंदराव ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर, सादिक इनामदार, सचिन बेलागडे, अमित कदम यांची नावे झळकत आहेत. त्यामुळे संबंधितांबरोबरच आणखी कोण-कोण असणार आहे, हे आजच्या दौऱ्यातून स्पष्ट होणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या फ्लेक्सची रेलचेल

उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्ह्यातून कोल्हापूरला आज दुपारी रवाना होणार आहेत. त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स पुणे-बंगळूर महामार्गावरील मोठ्या शहरांसह सातारा व कऱ्हाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. त्यावर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मुख्य काही नेत्यांचा अपवाद वगळता दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचे फोटो व नावे झळकत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांची नावे व फोटो त्या फ्लेक्सवर नसल्याने त्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT