कोरेगाव - मध्य रेल्वेने कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेऊन १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरते थांबेही देण्यात आले आहेत. Flood Special Train for Kolhapur and Satara
मध्य रेल्वेने कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एकूण २८ अनारक्षित विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर ते सातारा दरम्यान १४ विशेष आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ विशेष सेवांचा समावेश आहे.
कोल्हापूर- सातारा अनारक्षित विशेष (१४ फेऱ्या) : गाडी क्रमांक ०१४१२ अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून बुधवारपासून (ता. सात) १३ ऑगस्टअखेर दररोज ०८.४० वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी १३.२५ वाजता पोचेल.
गाडी क्रमांक ०१४११ अनारक्षित विशेष सातारा येथून बुधवारपासून (ता. सात) १३ ऑगस्टपर्यंत दररोज १४.२० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी १८.३५ वाजता पोचेल. या गाड्या वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, विश्रामबाग, सांगली, नंदरे, भिलवडी, किर्लोस्करवाडी, तकरी, भवानीनगर, शेणोली, कऱ्हाड, शिरवडे, मसूर, तारगाव, रहिमतपूर आणि कोरेगाव स्थानकावर थांबतील.
कोल्हापूर- मिरज अनारक्षित विशेष (१४ फेऱ्या) : गाडी क्रमांक ०१४१६ अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून बुधवारपासून (ता. सात) १३ ऑगस्टपर्यंत दररोज २०.१५ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी २१.२५ वाजता पोचेल.
गाडी क्रमांक ०१४१५ अनारक्षित विशेष मिरज येथून बुधवारपासून (ता. सात) १३ ऑगस्टपर्यंत दररोज ०६.५५ वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी ०८.०५ वाजता पोचेल. थांबे: वळीवडे, रुकडी, हातकणंगले आणि जयसिंगपूर स्थानकावर थांबेल.
काही गाड्यांना मंगळवारपासून (ता. सहा) १२ ऑगस्टपर्यंत निवडक स्थानकांवर तात्पुरते थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये भिलवडी व किर्लोस्करवाडी स्थानकांवर ट्रेन क्रमांक १६२१० म्हैसूर - अजमेर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १६५०६ बंगळूर- गांधीधाम एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १६५०८ बंगळूर- जोधपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६५३२ बंगळूर- अजमेर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १६५३४ बंगळूर- जोधपूर एक्स्प्रेस.
तर ताकारी स्थानकावर गाडी क्रमांक ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०३० कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस. गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०४० गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, कऱ्हाड स्थानकावर थांब्यावर ट्रेन क्रमांक १६५३३ जोधपूर- बंगळूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १६५३४ बंगळूर- जोधपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०४९ अहमदाबाद- कोल्हापूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०५० कोल्हापूर- अहमदाबाद एक्स्प्रेस थांबणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.