Shashikant Shinde esakal
सातारा

Bazar Samiti Election : 'शेतकऱ्यांसाठी विरोधात लढलो, पण 'या' चार आमदारांमुळं माझा पराभव झाला'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून बाजार समितीवर त्यांची एक हाती सत्ता आहे.

सकाळ डिजिटल टीम

तालुकास्तरावरील सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उतरण्याचा हा आमदार महेश शिंदे यांचा पहिलाच प्रयत्न होता. या प्रयत्नाला अपेक्षित यश आले नसले, तरी यश मात्र मिळविले आहे.

कोरेगाव (सातारा) : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Koregaon Bazar Samiti Election) सत्ताधारी विरोधकांनी केलेल्या आर्थिक तडजोडीमुळे कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागल्याची प्रतिक्रिया आघाडीचे प्रवर्तक व जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री (Sunil Khatri) यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

श्री. खत्री यांनी पत्रकात म्हटले आहे, की कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे माजी सभापती अशी पदे भूषविलेल्या तब्बल चार आमदारांच्या विरोधात सामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बाजार समितीची निवडणूक आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या कार्यकर्त्यांनी लढवली. सामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीत न्याय मिळावा, लयाला गेलेल्या संस्थेला गतवैभव मिळावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आर्थिक तडजोडीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून बाजार समितीवर त्यांची एक हाती सत्ता आहे. सर्वसामान्यांना बाजार समितीमध्ये प्रतिनिधित्व करता यावे, शेतकऱ्यांना न्याय देता यावा, यासाठी पुरेसे संख्याबळ व मतदार संख्या नसतानाही शेतकरी बांधवाचे हित जोपासण्यासाठी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बाजार समितीची सत्ता काबीज करणे हा त्यामागील उद्देश नव्हता, तर सर्वसामान्य घरातील सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संचालक होण्याचा बहुमान मिळावा, हा त्यामागील उद्देश होता.

राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार महेश शिंदे यांची भीती असल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना बरोबर घेण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्या विरोधात त्यांनी कायम राजकारण केले, त्यांनाच बरोबर घेण्याची वेळ त्यांच्यावर या निवडणुकीत आली. रामराजे नाईक- निंबाळकर, बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) या तिन्ही नेत्यांना तब्बल चार मेळावे व सभा घ्याव्या लागल्या.

विरोधक ४०० मताधिक्याने विजयाच्या वल्गना करत होते. मात्र, त्यांचे मताधिक्य शंभरच्या आसपास आणून ठेवले आहे. तालुकास्तरावरील सहकारी संस्थेच्या निवडणुकीत उतरण्याचा हा आमदार महेश शिंदे यांचा पहिलाच प्रयत्न होता. या प्रयत्नाला अपेक्षित यश आले नसले, तरी यश मात्र मिळविले आहे. भविष्यकाळात संपूर्ण कोरेगाव तालुक्यावर महेश शिंदे लक्ष केंद्रित करणार आहेत, असेही श्री. खत्री यांनी शेवटी पत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT