Shashikant Shinde esakal
सातारा

राष्ट्रवादीवर टीका कराल, तर जागा दाखवून देऊ : आमदार शिंदे

कोविडचा धंदा केल्यास उघडे पाडू : आमदार शशिकांत शिंदे

राजेंद्र वाघ

गेली दोन वर्षे आणि आजही आघाडी धर्माशी बांधिल आहे. एकदा-दोनदा सहन करेन.

कोरेगाव : सध्याच्या आमदारांनी कोविडमध्ये चांगले काम केले, चांगल्या कामाचे आम्ही कौतुकच करतो. आम्ही पण कोविडमध्ये थोडेसे काम केले; पण त्यासाठी पैसे घेतले नाहीत. पैसे कमावण्याचा धंदा करत असाल, तर उघडे पाडू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांचा नामोल्लेख टाळून दिला.

कटापूर (ता. कोरेगाव) येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार, तर आमदार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुनील माने, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर, प्रदीप विधाते, शहाजी क्षीरसागर, राजाभाऊ जगदाळे, भास्कर कदम, अरुण माने, सुरेखा पाटील, जयश्री फाळके, सुप्रिया सावंत, संजना जगदाळे, रमेश उबाळे, सतीश चव्हाण, प्रताप कुमुकले, अॅड. पांडुरंग भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘कोविडच्या औषधांसाठी दुकान एकच, रेमडेसिव्हर इंजेक्शन शासनाचे, मात्र ते मिळायचे ‘त्या’ एकाच दुकानात, रुग्ण अत्यवस्थ झाला, की पंढरपूरला रवानगी. पैसे कमावण्याचा धंदा करत असाल, तर उघडे पाडू. हे सरकार चांगले चालले पाहिजे, या भावनेपोटी दोन वर्षे काही बोललो नाही. गेली दोन वर्षे आणि आजही आघाडी धर्माशी बांधिल आहे. एकदा-दोनदा सहन करेन, राष्ट्रवादीवर टीका कराल, तर जागा दाखवू.’’

आमदार शशिकांत शिंदे हे या मतदारसंघापुरते नेते नाहीत, तर ते राज्याचे नेते आणि आमचे ऊर्जास्थान आहेत, असे नमूद करून नीलेश लंके म्हणाले, ‘‘वाघ दोन फूट मागे आला, तर तो तेवढीच मोठी झेप घेतो. असे हे संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व आहे. नगर येथील माझ्या संपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम सोडून मी येथे आलो आहे. यापुढेही त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी येणार आहे.’’ नुसती उद्‍घाटने करून कोणी नेता होत नाही. दिवसा उद्‍घाटने करा, शशिकांत शिंदे यांच्या कामाचीही उद्‍घाटने करा, असा टोला त्यांनी या वेळी लगावला. सुनील माने, भास्कर कदम, अशोक केंजळे यांचीही भाषणे झाली. उपसरपंच किरण केंजळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. डॉ. युवराज करपे, डॉ. आशुतोष बर्गे, डॉ. ओमकार पाटील, डॉ. शंतनू पवार, डॉ. विक्रम कणसे, डॉ. महेश पवार, डॉ. गणेश होळ आदींचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार झाला. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी कटापूर येथील बॅरेजजवळ ‘जिहे-कटापूर’चे पाणी पूजन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT