Koyana Dam sakal
सातारा

Koyana Dam: कोयनेतून १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Latest Koyana News: कोयना नदीपात्रात १२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती

सकाळ वृत्तसेवा

Latest Kolhapur News: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पडलेल्या पावसाची आवक आजही प्रतिसेकंद ४० हजार २१७ क्युसेक आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी आज दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटावरून दोन फुटांपर्यंत उचलून सांगण्यावरून १७ हजार ६०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विसर्ग वाढविल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहेत. अवघ्या दोन दिवसांत सात टीएमसी पाणीसाठा वाढल्याने आणि पाणीसाठ्याने शंभरी पार केल्याने मंगळवारी सकाळी पायथा वीजगृहातून दोन हजार १०० आणि सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटाने उचलून कोयना नदीपात्रात १२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली होती.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत होता. आज सायंकाळी पाच वाजता ही जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार २१७ क्युसेक पाण्याची होत आहे.

कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग चालू असतानाही धरणाचा एकूण पाणीसाठा १०२.६५ टीएमसी झाला आहे. विसर्ग चालू असताना जलाशयात २.२७ टीएमसी पाणीसाठा वाढल्याने आज दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटावरून दोन फुटांपर्यंत उचलण्यात आले.

दरवाजे उचलल्या मुळे सांगण्यावरून १७ हजार ६०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृहासह कोयना नदीपात्रात सध्या १९ हजार ७०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ७८ मिलिमीटर, नवजाला ९३ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT