Koyna Dam Sakal
सातारा

Koyna Dam Rain : कोयना पाणलोट क्षेत्रात पुन्हा वाढला पावसाचा जोर; पुन्हा वाढणार चिंता

कोयना धरणातुन उद्या सकाळी होणार ४० हजार क्युसेकवर विसर्ग, सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आज शुक्रवारी दुपारी विश्रांती घेतली होती. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सध्या कोयना धरणातुन ३० हजार क्युसेक आणि पायथा विजगृहातुन एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विर्सग करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातुन कोयना नदीत उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता १० हजार क्युसेकने वाढ करण्यात येणार असुन नदीपात्रात ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठी पुन्हा धोका वाढणार आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धऱणाचे सहा वक्र दरवाजे उचलुन १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.

त्यानंतर रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले. कोयना धऱणातील पाण्याची आवक ८५ हजार क्येसकवर होती. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढतच चालली होती. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी सात वाजता धरणातुन पाणी सोडण्याच्या क्षमतेते वाढ करुन आणखी १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान आज दुपारी १२ वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने पाणी वाढवण्यात येणार होते. मात्र आज शुक्रवारी दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे कोयना धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली होती. त्यामुळे आज दुपारी १२ वाजता वाढवण्यात येणारा १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आल्याने दिलासा मिळाला होता.

मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातुन उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता १० हजार क्युसेकने वाढ करण्यात येणार असुन नदीपात्रात ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातुन आणि पायथा वीजगृहातुन सोडण्यात आलेले एक हजार ५० क्युकेसमध्ये वाढ करुन तो दोन हजार १०० क्युसेक करण्यात आला आहे.

त्यामुळे कोयना नदीपात्रात ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा कृष्णा- कोयना नदीकाठी चिंता वाढणार आहे. कोयना पाणलोट क्षेत्रामधील पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल असे धरण व्यवस्थापनाने कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT