Koyna Dam Project esakal
सातारा

Koyna Dam Project : मुनावळेत जागतिक जलपर्यटनाला हिरवा कंदील; तब्बल 45 कोटींचा निधी मंजूर, पर्यटनाला मिळणार चालना

Green signal for global cruises in Munavle; As much as 45 crores of funds approved, tourism will get a boost; बांधकामाचा खर्च हा पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दिला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोयना धरण ‘शिवसागर जलाशय’ यावर मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

सातारा : कोयना धरणावरील (Koyna Dam) शिवसागर जलाशयावर (Shivsagar Reservoir) मुनावळे (ता. जावळी) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन (Water Tourism) विकसित करण्याच्या कामास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी ४५ कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.

जलपर्यटन प्रकल्पाचे बांधकाम हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ (Maharashtra Krishna Khore Vikas Mahamandal) यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. बांधकामाचा खर्च हा पर्यटन विभागामार्फत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दिला जाणार आहे. जल पर्यटनाशी संबंधित कामकाज, तसेच प्रकल्पाचे प्रचालन हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येईल.

प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाबरोबर करण्यात येणाऱ्या सामंजस्य करारातील तरतुदीनुसार करण्यात यावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे. कोयना धरण ‘शिवसागर जलाशय’ यावर मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याबाबत त्यानुसार प्रकल्पाची व्यवहारात, वित्तीय बाबी तपासून अनुसरून शासनाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, पहिल्या टप्यातील खर्चासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून १३ कोटी ६१ लाख वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. गुणनियंत्रण यंत्रणेद्वारे कामाची प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी केल्याचा प्रमाणित अहवाल, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा सचित्र दाखला आणि निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र न चुकता महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात यावे. त्यानंतर पुढील उर्वरित निधी वितरित केला जाईल.

वीस महिन्यांत काम होणार पूर्ण

जलपर्यटन विकसित करण्याकरिता पहिला टप्पा आठ महिन्यांत आणि दुसरा टप्पा २० महिन्यांत पूर्ण करण्यात यावा. जलपर्यटन विकसित करण्याची कार्यवाही कोयना धरण (शिवसागर जलाशयाच्या) ‘अ’ वर्ग प्रतिबंधित क्षेत्रात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध द्याव्यात. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, तसेच जलपर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेऊन जलाशयात मलजलप्रक्रिया केंद्र उभारणे, पर्यावरणस्नेही बोटींचा वापर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

पर्यटनास मिळेल चालना - शिवेंद्रसिंहराजे

मुनावळे येथे जागतिक दर्जाच्या वॉटर स्पोर्ट्स, जलपर्यटनाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे मुनावळे, कास, बामणोली या भागातील पर्यटनवाढीला चालना मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्‍वास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. (Tourism will get a boost - Shivendrasimharaje)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT