कऱ्हाड (सातारा) : कृष्णा कारखान्याची (Krishna Factory) सत्ता ‘धनशक्ती’च्या हातात आहे. ती श्रमिक, कष्टकरी जनशक्ती सभासदांच्या हाती देऊन त्यांना मालक करण्यासाठी निवडणूक (Krishna Factory Election) रिंगणात उतरलो आहे. नेहमीच त्यासाठी एल्गार करत राहणार आहे, असे मत कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांनी व्यक्त केले. संस्थापक पॅनेलच्या (Founder panel) प्रचारार्थ कऱ्हाड तालुक्यातील तारुख, कुसूर, येणके, किरपे, पोतले, घारेवाडी व येरवळे येथे श्री. मोहिते यांनी सभासदांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Krishna Factory Election Avinash Mohite Criticizes Dr. Suresh Bhosale And Inderjit Mohite Satara Political News)
डॉ. सुरेश भोसले यांना गेटकेनमधून मिळविलेल्या आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना रिअल इस्टेटच्या धंद्यातून मिळविलेल्या पैशाची घमेंड आहे.
याप्रसंगी दत्ता पाटील, अजित कुराडे, राजकुमार पाटील, संतोष पाटील, आत्माराम देसाई, प्रवीण देसाई, राहुल गरुड, शामराव गरुड, भानुदास माने, सदाशिव पवार, राजाराम घारे, सर्जेराव लोकरे उपस्थित होते. श्री. मोहिते म्हणाले, ‘‘डॉ. सुरेश भोसले (Dr. Suresh Bhosale) यांना गेटकेनमधून मिळविलेल्या आणि डॉ. इंद्रजित मोहिते (Dr. Indrajit Mohite) यांना रिअल इस्टेटच्या धंद्यातून (Real Estate Business) मिळविलेल्या पैशाची घमेंड आहे. वाममार्गाने मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर त्यांनी सभासदांना विकत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कारखान्याचे खासगीकरण करण्यास विरोध करणाऱ्या ऊस उत्पादक सभासदांना डॉ. भोसले यांनी अक्रियशील केले.
बझार, पतसंस्था बुडविणारांना जाब विचारालाच पाहिजे. डॉ. इंद्रजित मोहिते अपयशी गृहस्थ आहे. त्यांना स्वतःचा दवाखाना नीट चालविता आला नाही. (कै.)भाऊ कारखान्याच्या संस्थापकांपैकी एक होते. कारखान्यास भाऊंचे नाव असल्यामुळे डॉ. मोहिते यांना कृष्णा कारखाना आपली खासगी जहागिरी असल्याचा भ्रम निर्माण झाला आहे. मात्र, यशवंत बझार आणि यशवंतराव मोहिते पतसंस्थेतील ठेवी, भागभांडवल बुडवून सभासदांना आर्थिक गंडा घालणारे डॉ. मोहिते मते मागायला आपल्या दारात आल्यानंतर दोन्ही संस्थांचे कोट्यवधी रुपये कुठे मुरविले, याचा जाब सभासदांनी विचारायला हवा.’’
Krishna Factory Election Avinash Mohite Criticizes Dr. Suresh Bhosale And Inderjit Mohite Satara Political News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.