नवेखेड (सातारा) : सहकार पॅनेलला (Co-operation panel) या निवडणुकीत साथ द्या, आम्ही तुम्हाला मोफत साखर घरपोच करू, असे आश्वासन सहकार पॅनेलचे नेते डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) यांनी दिले. रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे सहकार पॅनेलच्या समर्थकांची कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Krishna Sugar Factory Election) सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उमेदवार जे. डी. मोरे, जितेंद्र पाटील, अविनाश खरात, संजय पाटील, जयश्री पाटील, दामाजीराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Krishna Factory Election Dr. Atul Bhosale Criticizes Dr. Indrajit Mohite Satara Political News)
विरोधक साखर गटऑफिसवर देऊ, असे म्हणत आहेत. आम्ही ती घरपोच देऊ, असे आश्वासन डॉ. अतुल भोसले यांनी दिले.
डॉ. भोसले म्हणाले, ‘‘विरोधक साखर गटऑफिसवर देऊ, असे म्हणत आहेत. आम्ही ती घरपोच देऊ. आम्ही जे बोलतो ते करतोच, भविष्यात एकरी उसाचे उत्पादन (Sugarcane production) वाढावे यासाठी कृषी परिषद या संस्थेची स्थापना करू. संचालक मंडळ नेमू. सहकार पॅनेलमध्ये नवीन येणारांचे स्वागत असेल. परंतु, जुन्या लोकांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ. विरोधकांच्या युतीची अवस्था म्हणजे शेखचिल्ली के हसीन सपने... अशी झाली आहे.’’ डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर डॉ. भोसले यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘त्यांच्यासारखा अभ्यासक नाही, दोन रुपये किलो दराची साखर १४ रुपये ४० पैसे केली. एक रुपयाचे बिल काढले, हा त्यांचा इतिहास आहे. यशवंतराव मोहिते यांच्या नावाची पतसंस्था बंद पडली.’’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘‘कृष्णा कारखान्याची निर्मिती अनेक अडचणींतून झाली, त्याचे अनेक साक्षीदार आहेत. भविष्यात कारखाना क्रमांक एकवर नेऊ. पाणी योजना सक्षम करू. विरोधकांनी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला. प्रतिटन ४०० रुपये बँकेला व्याज भरावे लागत आहे.’’ या वेळी मदनराव मोहिते यांचे भाषण झाले. बजरंग पवार यांनी आभार मानले.
Krishna Factory Election Dr. Atul Bhosale Criticizes Dr. Indrajit Mohite Satara Political News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.