Krishna Irrigation Project Boating Mahu-Hatageghar Dam Jawali esakal
सातारा

महू जलाशयातील बोटिंगने होणार मोठी आर्थिक क्रांती; पर्यटनाची अपेक्षा वाढली, रोजगारही होणार उपलब्ध

पसरणी घाटातील गर्दी पाहून ५० टक्के पर्यटक पाचवड - कुडाळहून पाचगणीला जाणे पसंत करत आहेत.

रविकांत बेलोशे

जलाशयात बोटिंग सुरू झाले, तर मोठी आर्थिक क्रांती या विभागात होणार आहे. अनेक पर्यटन संस्था आणि बोट क्लब या ठिकाणी तयार झाले आहेत.

भोसे : कृष्णा पाटबंधारे प्रकल्पांतर्गत (Krishna Irrigation Project) जावळी तालुक्यातील महू- हातगेघर धरणाचे Mahu- Hatgeghar Dam बिगुल वाजल्यावर पाचगणी पर्यटनस्थळाला (Panchgani Tourism) लागूनच असणाऱ्या जलाशयाची भुरळ पर्यटकांना पडणार असल्याने स्थानिक भूमिपुत्र खुश झाले.नौकाविहाराला दूर तापोळ्याला जाण्यापेक्षा महू जलाशय अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने या परिसरात पर्यटन वाढणार, याची आस या परिसरातून युवक व नागरिकांना लागली.

पाचवड महामार्गावरून पाचगणीला जाताना पसरणी घाटातील गर्दी पाहून ५० टक्के पर्यटक पाचवड - कुडाळहून पाचगणीला जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी होत आहे. या जलाशयात बोटिंग सुरू झाले, तर मोठी आर्थिक क्रांती या विभागात होणार आहे. अनेक पर्यटन संस्था आणि बोट क्लब या ठिकाणी तयार झाले आहेत. त्यांनाही पर्यटनाची अपेक्षा वाढली आहे.

यात प्रश्न आहे तो जर सिंचनासाठी पाणी सोडल्यास दीड टीएमसीमधील किती पाणी जलाशयात राहणार आणि आमच्या बोट कशा चालणार? पर्यटन कसे वाढणार? हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. यावर शासकीय पातळीवर नियोजन होणे गरजेचे आहे. स्थानिकांना या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी ज्या पद्धतीने धरणग्रस्तांचा प्रश्न लोंबकळत आहे, तसा पर्यटनाचा प्रश्न खेळवू नये, अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तांची आहे. यासाठी जसा शासन सिंचन, धरणग्रस्तांचा विचार करते, तसाच पर्यटनाचाही विचार करावा.

पर्यटनाला संधी मिळाल्यास या विभागातील महिलांनाही स्वयंरोजगारासाठी फायदा होणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना निवास न्याहरी , विविध छोट्या उद्योगांतून महिलाही सक्षम होण्यासाठी मदत होईल.

-सीमा रांजणे, ग्रामपंचायत सदस्य व प्रेरिका, दापवडी

विभागाचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याचा लाभ मिळणे क्रमप्राप्त आहे. या जलाशयाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायातून परिसरातील युवक व नागरिकांची आर्थिक क्रांती होणार आहे. त्यामुळे लाभ क्षेत्राचा विचार होताना पर्यटनाचा ही विचार होणे गरजेचे आहे.

-नितीन गावडे, उद्योजक

अशा आहेत पर्यटन संस्था

  • आमदार शशिकांत शिंदे पर्यटन सेवा सहकारी विकास संस्था, महू

  • दापवडी पंचक्रोशी सहकारी पर्यटन संस्था

  • काँग्रेश्वर पर्यटन संस्था, दापवडी

  • अटल पर्यटन संस्था

पर्यटन वाढल्यास...

  • बोटिंग सुरू झाल्यास वाढतील पर्यटक

  • जलाशय पाचगणीपासून केवळ ८ किलोमीटर अंतरावर असल्याने पर्यटक या ठिकाणी देतील भेट

  • युवक व स्थानिकांना रोजगाराच्या संधी

  • पर्यटनाच्या दृष्टीने हा विभाग आर्थिक सक्षम होईल

  • मासेमारी, बोटिंग व इतर व्यवसायाला मिळेल चालना

  • महिलांना उद्योगाच्या मिळतील संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT