Jitkarwadi Landslide esakal
सातारा

तुटलेल्या पुलाला शिड्या लावून नागरिकांचं स्थलांतर!

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : डोंगर खचून दरडी कोसळण्याची (Jitkarwadi Landslide) मालिका सुरूच असतानाही पूल तुटल्याने गावातच अडकून पडलेल्या जितकरवाडी (ता. पाटण) या दुर्गम गावातील २३ कुटुंबातील ९३ जणांना महसूल व पोलीस प्रशासनाने (Karad Police) जिंती (ता. पाटण) येथील माध्यमिक विद्यालयात (Jinti Secondary School) हलविले. तुटलेल्या पुलाला शिड्या लावून नागरिकांना गावाबाहेर नेण्यात आले. (Landslide At Jitkarwadi In Patan Taluka bam92)

जितकरवाडीत दोन दिवसांपासून डोंगर खचून दरडी कोसळत असल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे.

जितकरवाडीत दोन दिवसांपासून डोंगर खचून दरडी कोसळत असल्याने ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे. घरांपासून काही अंतरावरच हा प्रकार सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी अन्य गावात स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या होत्या. मात्र, जोरदार पावसामुळे गावाला जोडणाऱ्या पुलाचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने प्रशासनाला जितकरवाडीच्या ग्रामस्थांपर्यंत आणि ग्रामस्थांनाही गावाबाहेर पडणे शक्य होत नव्हते. दोन दिवसात पोलीस व महसूल प्रशासनाने जितकरवाडीपर्यंत पोहचण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अर्ध्या वाटेतून माघारी फिरावे लागले होते. पावसाने उघडीप दिल्याने प्रशासनाची टीम सकाळी पायपीट व कसरत करत जितकरवाडीत पोहचली.

Jitkarwadi

सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी डी. डी. डोंगरे, उपसरपंच उमेश चव्हाण, ग्रामसेवक सुरेश आहिरे, पोलीस कर्मचारी नवनाथ कुंभार, श्री. थोरात, पोलीस पाटील भगवान मत्रे व विजय सुतार आदींनी खचलेल्या डोंगराची पाहणी केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केल्यानंतर त्यांनीही त्यास होकार दर्शविला. दुपारी आवश्यक प्रापंचिक साहित्य सोबत घेवून २३ कुटुंबातील ९३ जण घरांना कुलूप ठोकून गावाबाहेर पडले. संपूर्ण मार्ग कसरतीचा असल्याने आवश्यक काळजी घेण्यात आली होती. भराव तुटलेल्या पुलावरून शिडीच्या साह्याने नागरिकांना वर घेवून मानवी साखळी करून नदी पलीकडे नेण्यात आले. जिंती येथील दैदिप्य विजय कांबळे विद्यालयात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामस्थांची पाळीव जनावरे जितकरवाडीतच एका ठिकाणी बांधून ठेवण्यात आली असून ठरविक ग्रामस्थांवर जिंतीतून येऊन जावून त्यांच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Landslide At Jitkarwadi In Patan Taluka bam92

Jitkarwadi Landslide

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT