Satara LCB esakal
सातारा

Satara Crime : एलसीबीकडून तब्बल 23 गुन्ह्यांचा छडा; 53 तोळे सोने, 46 हजारांचे चांदीचे दागिने हस्तगत

जिल्हा पोलिस दलाने नोव्हेंबर २०२२ पासून जिल्ह्यातील मालमत्तेबाबतचे १३८ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील दरोडा व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या.

सातारा : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) धडक कारवाई करत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेले दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे २३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांतील ५३ तोळे सोन्याचे व सुमारे ४६ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ३२ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यातही या विभागाला यश आले आहे.

या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी विभागाचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील दरोडा व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केले होते.

लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये रोहित ऊर्फ टक्या चिवळ्या पवार (रा. सुरवडी, ता. फलटण) याचा सहभाग असल्याचे या पथकाच्या तपासात समोर आले. त्यानुसार उपनिरीक्षक अमित पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी संशयिताकडे कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने साथीदारांसोबत खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण व पुणे जिल्ह्यातील सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिस पथकाने पुढील तपासात दरोड्याचा एक, जबरी चोरीचे पाच, घरफोडीचे १२ व अन्य चोऱ्यांचे पाच असे एकूण २३ गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले ३२ लाख दहा हजार रुपये किमतीचे ५३ तोळे सोन्याचे व ४६ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत केले.

अधीक्षक शेख, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवकर, सहायक निरीक्षक भोरे, उपनिरीक्षक अमित व पतंग पाटील, विश्‍वास शिंगाडे, सहायक फौजदार विश्‍वनाथ सपकाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, हवालदार शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधणे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, सनी आवटे, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, स्वप्नील कुंभार, अमित झेंडे, अजय जाधव, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, संकेत निकम, प्रवीण पवार, अधिका वीर, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, विजय निकम हे या कारवाईत सहभागी होते.

वर्षात मालमत्तेबाबतचे १३८ गुन्हे उघडकीस

जिल्हा पोलिस दलाने नोव्हेंबर २०२२ पासून जिल्ह्यातील मालमत्तेबाबतचे १३८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यात चोरीला गेलेला दोन कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातही पोलिस दलाला यश आले आहे. (This year, 138 property related crimes were detected)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT