सातारा : लाॅकडाऊन शिथिल करताना दारूची दुकाने, मॉल सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून सर्व राज्यांनी धार्मिक स्थळे खुली केली आहेत. पण, महाराष्ट्रात दारूची दुकाने व मॉल उघण्यास परवानगी दिली जाते. मग मंदिरे उघडण्यास हरकत काय, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २८) साताऱ्यात उपस्थित केला. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून इंन्फेक्शन रेशो देखील जवळपास १८ टक्क्यावर पोहचला आहे. आठवड्याभराचा रेशो काढला तर जवळ-जवळ २२ टक्के इतका आहे. तसेच सातारा सिव्हिल रुग्णालयामध्ये जे काही रुग्ण आहेत, त्यांना आयसीयूची कमतरता भासत आहे. त्याठिकाणी नवीन आयसीयू तयार करण्याचा विचार आहे, तसेच शासनाने जिल्हा प्रशासनाने पाठविलेला स्टेडियममधील हॉस्पिटलचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या दौ-यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, सिव्हिल रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा इथे अधिक रुग्ण पहायला मिळत असून १२८ ची क्षमता असणा-या रुग्णालयात १४८ रुग्ण आहेत. रुग्णालयात बेडची कमतरताही मोठी असून बेड वाढविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हेंटिलेटरची गरज भासत आहे. त्या-त्या रुग्णालयात आरटीपीआर टेस्ट करणे गरजेचे असून अॅन्टीजन टेस्टही व्हायला हवी. याबाबत सरकारने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.
राज्यातील धार्मिकस्थळ सुरु करण्याच्या प्रश्नावर फडणवीस यांना छेडले असता ते म्हणाले, लाॅकडाऊन शिथिल करताना दारूची दुकाने, मॉल सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून सर्व राज्यांनी धार्मिक स्थळे खुली केली आहेत. पण, महाराष्ट्रात दारूची दुकाने व मॉल उघण्यास परवानगी दिली जाते. मग मंदिरे उघडण्यास हरकत काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोक सोशल डिस्टन्सचंही पालन करतील, त्यामुळे देशापेक्षा महाराष्ट्र काही वेगळा नाही, त्यामुळे धार्मिकस्थळांबाबत सरकारने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील मनुगत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत त्यांनी, काॅंग्रेस नेत्यांवर सडकून टिका करत काॅंग्रेस नेत्याने तिथे पुतळा उभारु दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समाचार घेतला. दरम्यान, राज्यसभेचे खासदार कुठे आहेत, असे विचारल्यावर फडणवीस यांनी त्यांचा-माझा फोन झाला आहे, त्यांना थोडी कणकणी असल्याने ते आलेले नाहीत, असे त्यानी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.