Oxygen esakal
सातारा

चिंताजनक! साताऱ्यात गळतीमुळे 25 टक्के Oxygen वाया; प्लांटसाठी प्रयत्न आवश्‍यक

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोजचा बाधितांचा आकडा दोन हजारांवर गेला आहे.

उमेश बांबरे

सातारा : ऑक्‍सिजन (Oxygen) उपलब्धतेत सातारा जिल्हा स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर असला तरी सध्या 25 टक्के ऑक्‍सिजन विविध कारणांनी होणाऱ्या गळतीमुळे (Leakage) वाया जात आहे, तसेच गरजेपेक्षा जास्त साठाही हॉस्पिटलकडून (Hospital) केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन ऑक्‍सिजन बेडयुक्त हॉस्पिटल किंवा कोरोना केअर सेंटर (Corona Center) सुरू करण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलने ऑक्‍सिजन वापराचे ऑडिट केल्यास नव्याने होणाऱ्या कोरोना हॉस्पिटल्स व कोरोना केअर सेंटरना सहज ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध होऊ शकतील. (Leakage In Satara Wastes 25 Percent Oxygen Satara News)

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोजचा बाधितांचा आकडा दोन हजारांवर गेला आहे. त्यामध्ये 15 टक्के रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागत आहे. बाधितांची संख्या व बेडची उपलब्धता यात ताळमेळ बसताना दिसत नाही. ऑक्‍सिजन बेडची संख्याही अपुरी पडत आहे. जिल्ह्याला दररोज 40 ते 45 टन ऑक्‍सिजनची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी मुंबई, पेण येथून ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात सुरू असलेल्या दोन युनिटच्या माध्यमातून केवळ पाच ते दहा टन ऑक्‍सिजन मिळतो, तर लोणंद येथील ऑक्‍सिजन प्लांट कधी चालतो, कधी बंद पडतो. त्यामध्ये सातत्य दिसत नाही. जिल्ह्याला केवळ दोन दिवस पुरेल इतकाच ऑक्‍सिजनचा साठा केलेला आहे; पण या सर्व उपलब्धतेच्या तुलनेत विविध कारणांनी होणारी ऑक्‍सिजनची गळती लक्षात घेता, ऑक्‍सिजनची कमतरता भासते. परिणामी नव्याने होणारी कोरोना हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरना ऑक्‍सिजनअभावी परवानगी मिळत नाही.

ऑक्‍सिजन गळतीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्‍सिजन वाया जात आहे. सध्या जिल्ह्यात 20 ते 25 टक्के ऑक्‍सिजन गळतीमुळे वाया जात आहे. त्यामध्ये काही हॉस्पिटल्समधून होणारी गळती, वाहतुकीदरम्यान होणाऱ्या गळतीचा समावेश आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलचे ऑक्‍सिजनचे ऑडिट करणे आवश्‍यक आहे, तरच ही गळती रोखली जाऊन ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. काही ठिकाणी ऑक्‍सिजन संपेल या भीतीने जादा जंबो सिलिंडर घेऊन ठेवली जातात. त्यामुळे ही सिलिंडर अडकून पडतात. परिणामी, ज्यांना ऑक्‍सिजनची गरज आहे, त्यांना ऑक्‍सिजन सिलिंडर मिळू शकत नाहीत. या सर्व परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्‍सिजन स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात ऑक्‍सिजन प्लांट उभारणे गरजेचे आहे. त्यामध्ये पीएचसी युनिटमध्ये हवेतून ऑक्‍सिजन घेऊन तो क्षमतेनुसार जंबो सिलिंडरमध्ये भरता येतो. या प्रकल्पाला 50 ते 60 लाख रुपये लागतात. असे प्रकल्प तातडीने उभे राहिल्यास जिल्हा खरोखर ऑक्‍सिजन उपलब्धतेत स्वयंपूर्ण होईल.

जिल्ह्याची ऑक्‍सिजनची गरज : 40 ते 45 टन

ऑक्‍सिजन उपलब्धता : 35 टन

जिल्ह्यात निर्मिती : पाच ते दहा टन

ऑक्‍सिजन गळतीचे प्रमाण : 25 टक्के

Leakage In Satara Wastes 25 Percent Oxygen Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT