Wine Shop Sakal
सातारा

मद्यविक्री दुकानांची नावे बदलणार

गृहखात्याचा आदेश; गडकिल्ल्यांसह देवता, राष्ट्रपुरुषांच्या नावाला बंदी

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड - बहुतांश बिअरबारसह मद्यविक्रीच्या दुकानांना देवदेवता, राष्ट्रपुरुषांसह ऐतिहासिक गडकोटांची नावे आहेत. ती नावे बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गृहखात्याने ती नावे बदलण्याचे फर्मान काढले आहे. नावे बदलण्यासाठी ३० जूनपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मुदतीनंतर मद्यविक्रीच्या दुकानांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मद्यविक्री करणाऱ्या अनेक दुकानांना देवदेवतांसह राष्ट्रपुरुषांची नावे आहेत. त्यात अलीकडे गडकोटांच्या नावाने अनेक बिअर बारसह मद्यविक्रीची दुकाने थाटली जात आहेत. त्या अनुषंगाने तक्रारीही झाल्या आहेत. त्याशिवाय त्या नावांमुळे अनेक ठिकाणी विटंबना झाल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा झाली. त्यानंतर गृहखात्याने मद्यविक्रीच्या दुकांनाची देवदेवता, गडकोटांसह राष्ट्रपुरुषांची नावे बदलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार नुकताच तो आदेशही काढला आहे.

राज्यातील अनेक मद्यविक्री दुकानांना देवदेवता, राष्ट्रपुरुष आणि गड, किल्ल्यांची नावे आहेत. गडकोट किल्ले राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी सगळ्यांवर आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडून सर्व प्रकारच्या मद्यविक्रीच्या दुकानांना देवदेवता, राष्ट्रपुरुषांसह गडकोट किल्ल्यांची नावे देऊ नयेत, ती नावे दिल्याने त्यांचा अवमान होतो आहे, त्यामुळे धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक श्रद्धास्थानांचे अवमूल्यन होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या भावना दुखावून धार्मिक व सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी सर्व प्रकारच्या मद्यविक्री दुकानांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

विधिमंडळातही चर्चा

या विषयावर विधिमंडळात चर्चा झाली आहे. त्यानुसार शासनाने त्याबाबत ठोस व धोरणात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवदेवता, संत, महात्मा, राष्ट्रपुरुषांसह गडकोट किल्ल्यांच्या नावांचा वापर मद्यविक्री दुकानांनी केल्यास विटंबना तर होतेच, त्याशिवाय भावनाही दुखावल्या जात आहेत. परिणामी सामाजिक वातावरण दूषित होते. सर्वांच्या भावनांचा आदर करून सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT