कऱ्हाड (जि. सातारा) ः देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसांसह दोन सराईत संशयितांना साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. अमोल जगन्नाथ माने (वय 31, रा. ओगलेवाडी) व संभाजी संपत मदने (30, कामथी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे असा सुमारे 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संभाजी मदने हा कुख्यात गुंड सल्याचेप्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी निगडित संशयित आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना सुर्ली येथील बस स्थानक परिसरात एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे, अशी माहिती मिळाली. धुमाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे यांना त्याची माहिती देत कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेगले, साथीर मुल्ला, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, रवींद्र वाघमारे, मंगेश महाडिक, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, राजकुमार ननावरे, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, केतन शिंदे यांनी सुर्ली परिसरात सापळा रचला.
सुर्ली येथे बस स्थानकाजवळ पोलिस वेशांतर करून बसले होते. तेथे येणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व काडतुसांबाबत विचारपूस करताना उलटसुलट उत्तरे देत पिस्तूल व काडतुसे दुसऱ्याने एकाकडे ठेवण्यास दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली. संबंधित दुसरा संशयित तालुका पोलिस ठाण्यातील खुनाचा प्रयत्नशील फरार निघाला. तो वांगी (जि. सांगली) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जावून सापळा रचत त्यालाही ताब्यात घेतले.
खळबळजनक : पंजाबचा दहशतवादी नांदेडातून अटक; पंजाब व नांदेड पोलिसांची कारवाई, आयबी, एटीएस आणि एसआयडी अनभिज्ञ
'कराड जनता'च्या 296 कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.