Loksabha election 2024 Chandrashekhar Bawankule esakal
सातारा

Loksabha Election : 'तिसऱ्यांदा मोदीच पुन्हा पंतप्रधान, साताऱ्याचा खासदारही भाजपचाच होणार'; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होतील.

सकाळ डिजिटल टीम

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी साताऱ्याचा खासदार निवडून द्यावा.

सातारा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होतील. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा भाजपचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून द्या, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले.

तर देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घर चलो अभियानांतर्गत सातारा शहरातील बाजारपेठेत पदयात्रा काढून व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

तसेच २०२४ ला कोण पंतप्रधान होणार, तुमचा आवडता पंतप्रधान कोण असे प्रश्न विचारले. त्यावर सर्वांनीच मोदी मोदी मोदी... अशी उत्तरे दिली. त्यानंतर सराफ व्यावसायिक चंद्रशेखर घोडके यांच्या घरासमोर सभा झाली.

या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, सुनील काटकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले, विक्रांत पाटील, विक्रम पावसकर, सुरभी भोसले, रंजना रावत, सुजाता राजेमहाडिक, गीतांजली कदम, चंद्रशेखर घोडके, स्मिता घोडके, जयेंद्र चव्हाण, राजू भोसले, किशोर शिंदे, विकास गोसावी, धनंजय जांभळे, विक्रम पावस्कर यांच्यासह दोन्ही राजांचे माजी नगरसेवक व व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘‘मोदींनी निर्माण केलेल्या गरीब कल्याणच्या योजना घेऊन आम्ही जनतेत जात आहोत. जगातील १५० च्या वर देशांनी सर्वोकृष्ट पंतप्रधान म्हणून मोदींना मान्यता दिली आहे. जगातील ७८ टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे, तसेच१४ देशांचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदींनी केला आहे. त्या मोदींना हरविण्यासाठी आता २८ पक्ष एकत्र आले आहेत; पण साताऱ्याच्या जनतेने निर्णय घेतला आहे.

कितीही एक व्हा, उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली मोदी २०२४ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील, त्यावेळी साताऱ्याचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून येऊन मोदींचे समर्थन करेल. महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन संसदेत १९१ महिला खासदार पाहायला मिळतील. देशाच्या १४० कोटींच्या भवितव्यासाठी काम करतील. महाराष्ट्राच्या विधानसभेत गोरे व माझे काय होईल हे माहिती नाही; पण शंभर महिला आमदार असतील.

काँग्रेस पक्ष तर जनतेत सातत्याने भाजपविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. काँग्रेस पक्ष म्हणजे देशाला लागलेला कॅन्सर आहे, अशी टीका करून श्री. बावनकुळे म्हणाले, ‘‘या सर्वांना धडा शिकवण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सातारकरांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी साताऱ्याचा खासदार निवडून द्यावा, तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘सातारा लोकसभा मतदारसंघाचा येणारा खासदार हा शंभर टक्के भाजपचाच असेल. आमच्या लोकसभेचा खासदार हा नरेंद्र मोदीजी जेव्हा शपथ घेतील, त्यावेळी हात वर करण्यासाठी उभा असेल, असा शब्द सातारकरांच्या वतीने मी देतो. सातारा आणि जावळी विधानसभा मतदारसंघातून ६५ टक्केच्या पुढे मतदान हे भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराला होईल.

पदयात्रेस उदयनराजे अनुपस्थित..

चंद्रशेखर बावनकुळे यांची पदयात्रा मोती चौकातून सुरू झाली. या पदयात्रेत भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते; पण खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीची शहरात मोठी चर्चा होती. ते आजारी असल्याने उपस्थित नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT