LokSabha Election Karad esakal
सातारा

Loksabha Election : 'महायुती'ची एकजूट करणार महाविकास आघाडीची अडचण; मनोज घोरपडे-धैर्यशील कदम यांच्यात समेट

लोकसभेला महायुतीकडून या भागातील उमेदवार दिल्यास येथून त्याला मताधिक्य मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीने कोणतीही मदत न करता बाळासाहेब पाटील हे २००९ मध्ये या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

Loksabha Election : कऱ्हाड उत्तर मतदारसंघ हा सातारा, कोरेगाव, खटाव या तालुक्यांचा काही भाग मिळून निर्माण झाला आहे. येथे खासदार शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे; पण मागील तीन-चार वर्षांत झालेली राजकीय स्थित्यंतरे लक्षात घेता भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे या तिघांमुळे येथे महायुतीची ताकद वाढली आहे.

लोकसभेला महायुतीकडून या भागातील उमेदवार दिल्यास येथून त्याला मताधिक्य मिळणार आहे. कऱ्हाड उत्तर मतदारसंघाने लोकसभेसाठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम केले आहे; पण या मतदारसंघात अलीकडे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी या मतदारसंघात समावेश होणाऱ्या पुसेसावळी भागातील धैर्यशील कदम यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष केले आहे.

मनोज घोरपडे यांचीही येथे ताकद असून, ते यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. ते सध्या भाजपमध्ये असून, घोरपडे आणि कदम यांच्यात समेट घडवून आणून आमदार गोरे यांनी येथून महाविकास विरोधात बांधणी केली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारा सातारा तालुक्यातील काही भाग या मतदारसंघात येतो. त्यांना मानणारी मते ही यावेळेस महायुतीच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. रहिमतपूर परिसरातील काही भाग या मतदारसंघात येतो. त्यावर शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मानणारा गट आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीने कोणतीही मदत न करता बाळासाहेब पाटील हे २००९ मध्ये या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांची या मतदारसंघात घट्ट पकड आहे. भाजपने मागील तीन -चार वर्षांपासून केलेल्या बेरजेच्या राजकारणामुळे येथे महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असेल, त्यावर या मतदारसंघात चर्चा आहे. कऱ्हाड भागातील उमेदवार लोकसभेला असेल, तर त्याच्या बाजूनेच मताधिक्य जाते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात आहे; पण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

भाजपकडून कार्यकर्त्यांना ताकद

भाजपने या मतदारसंघात अनेक महत्त्वाची पदे देऊन कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सातारा लोकसभेला झाल्यास कऱ्हाड उत्तरमधून कोणाच्या पारड्यात मताधिक्य जाणार याची उत्सुकता आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT