कऱ्हाड (सातारा) : कोविडच्या उपाययोजनांसाठी सर्वच लोकप्रतिनिधींचे एप्रिल 2020 पासूनचे सर्व भत्ते व मानधन जनरल फडांकडे वर्ग करण्याचा ठराव केला होता. मे २०२० मध्ये झालेल्या मासिक बैठकीत ठरावही झाला होता, तरीही नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून एप्रिल पासूनचे आजअखेरचे त्यांचे मानधन परस्पर काढले. त्यामुळे नगराध्यक्षांनी कऱ्हाडकरांसह पालिकेच्या सभागृहाचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी कऱ्हाडकरांची माफी मागावी. त्या भ्रष्टाचाराबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे, अशी माहिती लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील (lokshahi aghadi leader Saurabh Patil) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
नगराध्यक्षांनी कऱ्हाडकरांसह नगरसवेकांची फसवणूक केली असून ठरावात केलेला बदल हीच फसवणूक, भ्रष्टाचारासारखेच कृत्य आहे.
लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील, नगरसवेक मोहसीन आंबेकरी, वैभव हिंगमीरे, पल्लवी पवार, अनिता पवार, सुहास पवार, जयंत बेडेकर, शिवाजी पवार उपस्थित होते. गटनेते पाटील म्हणाले, पालिकेच्या मे २०२० मध्ये झालेल्या मासिक बैठकीत गटनेते राजेंद्र यादव यांनी ठराव मांडला. त्यात सर्वच नगरसेवकांचे भत्ते, मानधन कोविडच्या उपाययोजना वर्ग करत असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी भाजपतर्फे फारूक पटवेकर यांनीही संमती दिली. दरम्यान, नगराध्यक्षासहीत सर्वांचे मानधन, भत्ते कोविडच्या उपाययजोनांना वर्ग करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. मात्र, कालांतराने त्या ठरावातील मानधन शब्द वगळून मुळ ठरावात बदल करून तो लिहीला गेला. त्यामुळे एप्रिल पासूनचे आजअखेरचे मानधन नगराध्यक्षांनी परस्पर काढून घेतले आहे.
त्यामुळे नगराध्यक्षांनी कऱ्हाडकरांसह नगरसवेकांची फसवणूक केली आहे. त्यांनी ठरावात केलेला बदल हीच फसवणूक, भ्रष्टाचारासारखेच कृत्य आहे. नगराध्यक्षांना मिळणाऱ्या मानधनासहीत भत्ते जनरल फंडाकडे वर्ग करण्याचा एकमताचा ठराव असताना त्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपसूचनेतील मानधन शब्द हेतूपुरस्पर वगळून तो ठराव लिहीला आहे. त्यामुळे त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्यांच्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकशाही आघाडीने अधिकृतरित्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे कारवाईसाठी तक्रार केली आहे.
...ही तर कामाची पोच
लोकशाही आघाडीचे सदस्य होते. त्यामुळे आम्हाला सुरूवातीला जमेत धरले जात नव्हते. कालची ही पोरं काय विरोध करणार अशी अवहेलनाही झाली. तेच नगरसेवक अर्थसंकल्पाचा चांगला अभ्यास आहे, असे पाच वर्षात म्हणत आहेत. अर्थसंकल्पाबाबत काय प्रतिक्रिया आहे, ते जाणून घेण्यासाठी कान लावून बसले आहेत, त्यामुळे पाच वर्षात आमच्या अभ्यासाचीच पोच आहे, असा टोला सौरभ पाटील यांनी लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.