lonand apmc election result sakal
सातारा

Lonand APMC Result : खंडाळ्याच्या पिचवर आमदार मकरंद पाटलांनी विरोधी भाजप -सेना महायुतीची केली घोबीपछाड

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील यांनी एकूण १८ पैकी १७ जागा जिंकून पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली.

रमेश धायगुडे

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील यांनी एकूण १८ पैकी १७ जागा जिंकून पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली.

लोणंद - लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने एकूण १८ पैकी १७ जागा जिंकून लोणंद बाजार समितीत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली वर्चस्व सिध्द केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी तालुक्यात एकत्र आलेल्या भाजप -सेना, काँग्रेस व अन्य पक्षाच्या महायुतीला मात्र केवळ एक जागा मिळाली आहे. त्यामुळे खंडाळ्याच्या पिचवर आमदार मकरंद पाटील हेच पुन्हा एकदा चॅम्पीयन ठरले आहेत. निवडणूकीपुरते एकवटलेल्या विरोधकांनी मात्र त्यांच्याकडून धोबीपछाड व्हावे लागले आहे.

दरम्यान महायुतीने चांगले मताधिक्य मिळवले मात्र विजयामध्ये त्याचे रुपांतर करता आले नाही. तर गेल्यावेळी पेक्षा यावेळी राष्ट्रवादीचे मताधिक्य घटल्याने त्यांच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. विजयी सभेत आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना तसे सांगितले.

मतदारसंघ निहाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढील प्रमाणे - सोसायटी मतदार संघ (सर्वसाधारण ७ जागा) - सुनील संपत शेळके ( ३३९ ),सिद्धेश्वर दत्तात्रय राऊत (३३१ ), भानुदास दगडू यादव ( ३३० ), भगवान तात्याबा धायगुडे ( ३२६),शिवाजी दादा शेडगे ( ३१९),नारायण दादासो धायगुडे ( ३१४),यशवंत श्रीरंग चव्हाण ( ३०३)

सोसायटी महिला राखीव मतदार संघ (दोन जागा) - वैशाली चंद्रकांत घाडगे ( ३४६) व उज्वला दिनकर मांढरे (३४०)

सोसायटी इतर मागास प्रवर्गातून ३३७ मते मिळवत राजेंद्र यशवंत नेवसे हे विजयी झाले आहेत. तर भटक्या व विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विजय मारूती धायगुडे हे ३५८ माते मिळवून विजयी झाले. सोसयटी मतदार संघातील सर्वच्या सर्व ११ जागा राष्ट्रवादीच्या पॅनलने ८० मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघ ( सर्वसाधारण दोन जागा) संग्राम अप्पासाहेब देशमुख ( २७५) व साहेबराव किसन धायगुडे ( २४३) मते मिळवत विजयी झाले.

ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून संजय अर्जुन कदम यांनी २९३ मते मिळवत विजय मिळवला. तर आर्थिक दृष्या दुर्बल घटक प्रवर्गातून सतिश मोरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. येथे विजयी उमेदवारांनी ८६ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

व्यापारी मतदार संघ ( दोन जागा) : अरुण गोविंदराव गालिंदे ( १८२) व जयेश सुरेशचंद्र शहा ( १५५) मते मिळवत विजयी झाले. येथे विजयी उमेदवारांनी ६३ मतांची आघाडी घेतली आहे.

हमाल मापाडी मतदार संघातून भाजप - शिवसेना, कॉंग्रेस व अन्य पक्ष महायुतीचे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विश्वास सदाशिव शिरतोडे हे १८२ मते मिळवत विजयी झाले आहे. त्यांनी ७५ मतांची आघाडी घेतली.

एकूण ९ फेऱ्यांद्वारे मत मोजनी चार तासानंतर पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा खंडाळ्याचे सहाय्यक निबंधक देवीदास मिसाळ यांनी मतमोजणी प्रक्रियेचे नेटके नियोजन केले होते. खंडाळ्याचे पोलिस निरिक्षक महेश इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकार्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिष भाजी करत विजय साजरा केला. तर आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थित खंडाळा येथे विजयी सभा झाली. त्यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मकरंद पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, अॅड. शामराव गाढवे,उदय कबुले,राजेंद्र तांबे, मनोज पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT