Lonand Police Station esakal
सातारा

खंडणी गुन्ह्यातील फरारी आरोपींना तिरकवाडीत अटक

रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : लोणंद-बारामती पोलीस ठाण्यात (Lonand-Baramati Police Station) दाखल असलेल्या पाच कोटी खंडणीच्या गुन्ह्यातील (Ransom crime) फरारी दोन संशयित आरोपींना लोणंद पोलिसांनी (Lonand Police Station) तब्बल चार महिने सतत मागावर राहून शोध घेवून तिरकवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत सापळा रचून जेरबंद केले. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, डोंबाळवाडी (ता. फलटण) येथील अविनाश शामराव सोनवलकर यांचे ५ फेब्रुवारी २०२१ रोजी डोंबाळवाडी गावच्या हद्दीतील सुळवस्तीवरील कॅनाॅलच्या पुलावरुन अपहरण करुन या संशयित आरोपींनी त्यांच्याकडे पाच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. (Lonand Police Arrested Two People From Phaltan In Ransom Case Satara Crime News)

लोणंद-बारामती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण व खंडणी प्रकरणातील फरारी दोन संशयित आरोपींना लोणंद पोलिसांनी तिरकवाडी (ता. फलटण) येथे जेरबंद केले आहे.

या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, लोणंद पोलिसांनी अपहरण झालेल्या अविनाश शामराव सोनवलकर यांची त्याच दिवशी फलटण येथून संशयित आरोपी सुनील लक्ष्मण दडस (रा. दुधेबाबी, ता.फलटण) यांचे प्लॅट मधून सुटका केली होती. परंतु, यातील आरोपी हे परागंदा झाले होते. तसेच सदर संशयित आरोऱ्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाचप्रकारे पाच कोटी रूपयांच्या खंडणीसाठी एका इसमाचे अपहरण केले होते. दरम्यान, या दोन्ही प्रकरणातील आरोपी हे गुन्हा घडल्या पासून फरार होते. लोणंद पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची टिम या प्रकरणातील आरोपींच्या मागावर होती. संशयित फरारी आरोपींचा शोध घेत होती. लोणंद पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी प्रवीण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव रा. तिरकवाडी (ता. फलटण) व बारामती शहर पोलीस ठाण्याकडील (Baramati City Police Station) खंडणीच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी विशाल दिनकर नरवडे रा. न-हे, (जि. पुणे) हे तिरकवाडी (ता. फलटण) येथे आले असल्याची गोपनीय माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर (Assistant Police Inspector Vishal Vaikar) यांना मिळाली.

त्यानुसार लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तिरकवाडी येथे जावून सापळा रचून शिताफिने या दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले. तब्बल चार महिने या फरारी संशयित अरोपींच्या सातत्याने मागावर राहून त्यांचा शोध घेण्यास लोणंद पोलिसांना अखेर यश आले. त्याबद्दल लोणंद पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, पोलीस हवालदार श्रीनाथ कदम,अभिजित घनवट, सागर धेंडे, अमोल पवार, ज्ञानेश्वर साबळे आदी या कारवाईत सहभागी झाले होते. या प्रकरणाचा लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

Lonand Police Arrested Two People From Phaltan In Ransom Case Satara Crime News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT