Dr. Machindra Sakte esakal
सातारा

सारथी संस्थेकडे निधी वळवून मागासवर्गीयांवर अन्याय

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : सरकारने सामाजिक न्याय विभागाकडील (Department of social justice and empowerment Maharashtra) २०० कोटींचा निधी सारथी (Sarathi Sanstha) संस्थेकडे वळवून मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. मराठा समाजासाठी (Maratha Community) सारथी संस्थेस सरकारने एक हजार कोटी रुपये द्यावेत. पण, गरिबांच्या तोंडचा, हक्काचा घास काढून घेण्याचे पाप करू नये, अशी टीका दलित महासंघाचे (Dalit Federation) संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे (Dr. Machindra Sakte) यांनी केली. (Machhindra Sakte Criticizes The Government For Diverting Funds To Sarathi Sanstha Satara Marathi News)

सरकारने सामाजिक न्याय विभागाकडील २०० कोटींचा निधी सारथी संस्थेकडे वळवून मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे.

दलित महासंघाच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांची चिंतन बैठक येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे, राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे, शंकरराव महापुरे, बाबासाहेब दबडे, विकास बल्लाळ, रमेश सातपुते, प्रा. अमोल महापुरे उपस्थित होते. प्रा. सकटे म्हणाले, गरिबांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारची इच्छाच नसल्याने महाआघाडी सरकार कोणासाठी, हेही महत्त्‍वाचे आहे. सरकारने सामाजिक न्याय विभागाकडील २०० कोटींचा निधी सारथी संस्थेकडे वळवून मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. मराठा समाजासाठी सारथी संस्थेस सरकारने एक हजार कोटी रुपये द्यावेत. पण, गरिबांच्या तोंडचा हक्काचा घास काढून घेण्याचे पाप करू नये.

दलित महासंघ दलित मागासवर्गीयांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन राज्यभर आंदोलन करेल. वाटेगावचे अण्णाभाऊंचे स्मारक जागतिक कीर्तीचे व्हावे, यासाठी लढा उभारणार आहोत. वाटेगावचे स्मारक मातंग समाजाच्या आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. महाआघाडी सरकारची मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची इच्छाच नसल्याचेही ते म्हणाले. प्रा. पुष्पलता सकटे म्हणाल्या, दलित महासंघाशी ज्यांचा संबंधच नाही, अशा मंडळींनी दलित महासंघ, त्याचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर बोलू नये. त्यांचा चांगलाच समाचार घेतला जाईल. प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. हरिभाऊ बल्लाळ, सूरज घोलप, जयवंत सकटे, शंकर अवघडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश सातपुते यांनी आभार मानले.

Machhindra Sakte Criticizes The Government For Diverting Funds To Sarathi Sanstha Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT