Sharad Pawar Ajit Pawar Sakal
सातारा

Loksabha Election : 'लोक शरद पवारांच्या पाठीशी, माढ्यात निश्चित परिवर्तन घडेल'; NCP नेत्याचं थेट महायुतीलाच चॅलेंज

आजही शरद पवार यांच्या पाठीशी भक्कम असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्वहितासाठी नेते मंडळी इतर पक्षांत गेली असली तरी सामान्य जनता मात्र आजही शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.

कुकुडवाड : माढा लोकसभेची आगामी निवडणूक (Madha LokSabha Elections) उमेदवारीसाठी नव्हे, तर विचारांची लढाई आहे. हा देश शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा असून, शरद पवार यांना मानणारा हा मतदारसंघ असून, यंदा या लोकसभा निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल, असे स्‍पष्‍टीकरण राष्‍ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप (AbhaySinh Jagtap) यांनी केले.

ते माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जगताप म्‍हणाले, ‘‘शरद पवार यांच्‍या पाठीशी इथली जनता ताकद उभा करेल. यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा, या उदात्त हेतूने हे शिवधनुष्य मी हाती घेतले आहे. किंबहुना शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला लोकसभेसाठी उभा करेल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी एक कार्यकर्ता या नात्याने मी घेत आहे.

करमाळा, माढा, सांगोला, फलटण, माळशिरस, माण- खटाव या मतदारसंघात इंडिया आघाडीला मानणारा मतदार बांधव प्रचंड असून, स्वहितासाठी नेते मंडळी इतर पक्षांत गेली असली तरी सामान्य जनता मात्र आजही शरद पवार यांच्या पाठीशी भक्कम असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.’’

देशाचे सार्वभौमत्व पाहता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता सार्वभौम आहे, याची जाणीव आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना करून देण्याची वेळ समीप आली असून, सर्वांना भयमुक्त काम करता आले, तर लोकशाही टिकेल,’’ असे मत संवाद दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी माढा मतदारसंघातील तालुकाध्‍यक्ष संतोष वारे, शहराध्‍यक्ष समाधान शिंगटे, सुनील सावंत, प्रतापराव जगताप, हनुमंत मांढरे- पाटील, सतीश फंड उपस्थित होते.

मोदी सरकारच्‍या काळात बेकारी वाढली

लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही गतिमान तत्त्वे आहेत. त्याला तिलांजली सध्या मिळत आहे. सामाजिक लोकशाहीचा पाया खंबीर केला, तरच राजकीय लोकशाही टिकेल. देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असल्याचे मत अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT