Mahabaleshwar Municipality esakal
सातारा

शिंदे दाम्पत्याने पालिकेची अब्रू आणली चव्हाट्यावर

उपनगराध्यक्ष सुतारांनी नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराचा फाडला बुरखा

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : कोरम नसलेली पालिकेची (Mahabaleshwar Municipality) सर्वसाधारण सभा रद्द होते, हा कायदा आहे. परंतु, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे (Mayor Swapnali Shinde) यांचे कायदेतज्ञ पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी स्वतःच कायदा करून सर्वसाधारण सभा तहकूब केली. ही सभा नुकतीच पुणे आयुक्तांनी अवैध ठरविलीय. अस्तित्वास असलेल्या कायद्याचा मान ठेवून व नगरसेवकांना विश्वासात घेवून कारभार केला असता, तर नगराध्यक्षा शिंदे व त्यांचे कायदेपंडीत पती नगरसेवक कुमार शिंदे यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आली नसती, असा टोला उपनगराध्यक्ष अफजल सुतार (Deputy Mayor Afzal Sutar) यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी 31 मार्च रोजी पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.

नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी 31 मार्च रोजी पालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. पालिकेतील उपनगराध्यक्ष सुतार व त्यांचे समर्थक नगरसेवक यांनी या सभेला दांडी मारली. एकाच वेळी 13 नगरसेवक गैरहजर राहिल्याने या सभेला कोरम भरला नाही. कोरम नसल्याने ही सभा रद्द करण्याची सूचना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली. परंतु, नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांची सूचना फेटाळून ती सभा तहकूब केली. तहकूब केलेली सभा नगराध्यक्षांनी पुन्हा 1 एप्रिल रोजी आयोजित करून उपस्थित 3 नगरसेवकांच्या मदतीने विषय पत्रिकेतील 84 विषय मंजूर केले. नगराध्यक्षांची ही कृती बेकायदशीर असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी या सभेबाबत व त्या सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम 308 नुसार तक्रार दाखल केली. हे प्रकरण व्हाया उच्च न्यायालय मार्गे पुणे विभागीय आयुक्तांकडे आले. विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी नगराध्यक्षांनी तहकूब केलेली सभा व त्या सभेत मंजूर करण्यात आलेले सर्व ठरावांच्या अंमलबजावणीस प्रतिबंध केला आहे.

या संदर्भात आपल्या गटातील नगरसेवकांची बाजू मांडण्यासाठी आज येथील हॉटेल अनुपम येथे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष सुतार यांनी नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराचा बुरखा फाडला. शहरातील अनेक मान्यवरांनी नगराध्यक्षपद भूषविली आहे. या नगराध्यक्षपदाची गरीमा सांभाळत सर्वांनी काम केले, परंतु अशा प्रकारे मनमानी आणि दहशतीचा वापर करून कोणी सत्ता उपभोगली नाही. पालिकेतील इतर नगरसेवकांना विश्वासात घेवून या मंडळींनी कारभार केला. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर , पी. डी. पारठे , किसनसेठ शिंदे व इतर सर्वांनी सत्तेचा कधी दुरूपयोग केला नाही. अनेक महिलांनी देखील नगराध्यक्ष पद भुषविले आहे. परंतु, त्यांच्या पतींनी पत्नीच्या कारभारात कधीही ढवळा-ढवळ केली नाही. परंतु सध्याचे नगराध्यक्षांनी मनमानी कारभाराचा उच्चांक मोडून नगराध्यक्षपदाची प्रतिमा मलिन केली आहे. पालिकेची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष सुतार यांनी पत्रकार परिषदेत केला.

सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील काही विषय वगळण्याची मागणी आम्ही केली होती. हे विषय वगळले असते, तर नगराध्यक्षांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते, म्हणून आमची मागणी नगराध्यक्षांनी मान्य केली नाही. म्हणूनच आम्हाला त्या सभेवर बहिष्कार घालावा लागला, असे सांगून तत्कालिन मुख्याधिकारी यांच्या बरोबर संगनमत करून केलेला पालिकेतील अनियमित कारभार आता वेगेवगळ्या प्रकरणात चव्हाट्यावर आला आहे. याची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी सुरू आहे. या चौकशीचे निकाल लवकरच बाहेर पडतील. चार वर्षात एकही विकासाचे काम करता आले नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. परंतु, तसे होणार नाही शेवटी जनतेलाच पुढील निवडणुकीत निर्णय घ्यावा लागणार आहे, असा टोलाही सुतार यांनी लगावला. या वेळी सुतार यांच्या गटातील काही नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT