mapro garden 
सातारा

महाबळेश्वरात पर्यटकांचा लाेंढा; प्रशासनाचा ‘मॅप्रो’स दणका

अभिजीत खूरासणे

तालुक्यात महाबळेश्वर शहर वगळता सर्वत्र लॉज, हॉटेल चालू आहेत. पर्यटकांना तेथे प्रवेश दिला जातो. महाबळेश्वरात मात्र पर्यटकांना बंदी आहे. या नियमामुळे महाबळेश्वरकरांवर अन्याय होत आहे.

महाबळेश्वर : सातारा जिल्हा आजमितीस ही ‘रेड झोन’मध्ये असून, महाबळेश्वर येथील हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांना घेण्यास बंदी आहे. परंतु, असे असले तरी शहरहद्दीबाहेर असलेल्या खासगी बंगले, लहान हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांची वर्दळ पाहावयास मिळत आहे. हेच पर्यटक महाबळेश्वरच्या बाजारपेठेत देखील मनसोक्त फेरफटका मारताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान प्रशासनाच्या नियमांचा भंग केल्याने मॅप्रो कंपनीवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (mahableshwar-tourists-gathered-near-mapro-garden-fine-five-thousand-satara-news)

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर दहा टक्क्यांपेक्षा कमी होत नसल्याने जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनी याबाबत नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार हॉटेल व लॉजमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील अधिकृत हॉटेल व्यवसाय करणारे अनेक मोठी हॉटेल व लॉज या नियमांचे काटेकोर पालन करीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे कायम घरात राहून कंटाळलेले पुण्या-मुंबईचे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू पाहात आहेत. यासाठी ते हॉटेलसाठी महाबळेश्वर येथे फोन करून चौकशी करीत आहेत. शहरातील हॉटेल मालक हॉटेल बंद आहे असे सांगतात. परंतु, शहराबाहेरील हॉटेल व लॉज मालक बेकायदेशीररित्या अशा पर्यटकांना प्रवेश देत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉज आहेत. अनेक खासगी बंगलेदेखील आहेत. या बंगल्यांतून देखील मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. महाबळेश्वर-तापोळा रस्ता, महाबळेश्वर-प्रतापगड, महाबळेश्वर-केळघर या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर हॉटेल व लॉज आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना हॉटेल व्यवसाय केला जातो.

शुक्रवारपासून पर्यटकांच्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे. शहरात नाक्यावर पालिकेच्या वतीने वाहनांची तपासणी केली जाते. ई-पास आहे का नाही, याची तपासणी केली जाते तसेच शहरात तुम्हाला राहता येणार नाही, याची कल्पना दिली जाते म्हणून अनेक पर्यटक शहरात न येता शहराबाहेर असलेल्या खासगी बंगल्यांत व काही लहान हॉटेल, लॉजमध्ये राहणे पसंत करतात. या ठिकाणी कोणी तपासणी करीत नसल्याने बिनदिक्कत पर्यटकांची तीन ते चार दिवसांची सहल यशस्वी होते.

प्रशासनाच्या नजरेतून वाचविण्यासाठी पर्यटकांना जादा आकार द्यावा लागतो. लॉकडाउनमुळे कंटाळलेले पर्यटक जादा दर देऊन सर्व सुखसोयींचा उपभोग घेत आहेत. तालुका प्रशासनाने यासाठी तालुक्यातील अशा ठिकाणी छापा मारून विनापरवाना पर्यटकांना हॉटेल, लॉजमध्ये प्रवेश देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शहरातील व्यावसायिकांकडून नियमांचे पालन

शासनाचे नियम पाळून शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु, विनापरवाना धंदा करणाऱ्यांनी लॉकडाउनमध्ये देखील धंदा चालू ठेवला आहे. अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांना तालुका प्रशासन अद्दल घडविणार की नाही, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Mahableshwar

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्‍ह्यात विकेंडला कडक लॉकडाउन जाहीर करून सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. तरीही व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी मॅप्रो कंपनीला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. शनिवारी महाबळेश्वर- पाचगणी रस्ता, भिलार, भौसे, नंदनवन कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक मुक्कामी आले होते. हे सर्व पर्यटक रविवारी चेकआउट करून बाहेर पडले. या पर्यटकांना महाबळेश्वरात कडक बंदमुळे काही खरेदी करता आली नाही. परंतु, गुरेघर येथे मॅप्रो कंपनीने व्यवसाय सुरू ठेवल्याने पर्यटकांची तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली हाेती. या संबंधी तक्रार आल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदासांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मेप्रो कंपनीस पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT