म्हसवड - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेल्या पावसामुळे विजेचे खांब पडले. आंबा, द्राक्ष बागेसह काढणीस आलेल्या रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. यापुर्वी गेल्या रविवारी पहाटे पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे - मलवडी परिसरात वादळी वारे व अवकाळी पावसाचे संकट शेतक-यावर कोसळले होते, त्यानंतर पुन्हा काल रविवारीच रात्री दहा ते अकराच्या सुमारास पुन्हा या गावासह तालुक्यातील इतर गावासही विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला.
या चक्रीवादळात पळसावडे येव देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा बाग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याची घटना घडली. विशेष बाब म्हणजे कृष्णराव बाबर यांची आंबा बागेतील फळे खरेदी करण्यासाठी कालच व्यापारी येऊन गेले होते. १४० रु. किलो दराने दराने संपूर्ण बागेतील आंबा फळे खरेदी करण्याचे व्यापा-यांनी निश्चित केले होते. पुढील आठ ते १० दिवसांत बाग उतरायची होती. अंदाजे १२ ते १३ टन माल अपेक्षित होता. परंतू अवकाळी पावसासोबत आलेलेल्या वादळी वा-यामुळे कृष्णराव बाबर यांच्या बागेच्या प्रत्येक झाडाचे सुमारे साठ टक्के आंबा फळे गळून झालाखाली सडा पडला.अनेक झाले झाडांच्या फांद्या तुटून जमिनीवर पडल्या या घटनेत श्री. बाबर यांचे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कालच्या वादळी वा-यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे शेवरी,लोधवडे गावाच्या परिसरातील विजेचे खांब पडून विजपुरवठा खंडीत झाला आहे . काल रात्री दहा पासुन आज सकाळ पर्यंत माण तालुक्यातील गावोगावचे विज पुरवठा खंडीत होऊन अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.