Maratha Reservation Bike rally in Karad esakal
सातारा

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या उपोषणाला कऱ्हाडकरांचा पाठिंबा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी.

हेमंत पवार

बंद हा शांततेत व संयमात असला पाहिजे, जाळपोळ उद्रेकास मराठ्यांचा पाठिंबा नाही, असेही जरांगे पाटील यांनी सूचित केले आहे.

कऱ्हाड : एक मराठा.. लाख मराठा.., आरक्षण (Maratha Reservation) आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे.., कोण म्हणतंय देत न्हाय.., घेतल्याशिवाय रहात न्हायं.... या ना अशा घोषणा देत मराठा समाजाच्यावतीने आज बुधवारी दुचाकी रॅली काढून कऱ्हाड (जि. सातारा) बंदची हाक देण्यात आला. त्याला कऱ्हाड शहरात व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळाला.

राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

बंद हा शांततेत व संयमात असला पाहिजे, जाळपोळ उद्रेकास मराठ्यांचा पाठिंबा नाही, असेही जरांगे पाटील यांनी सूचित केले आहे. त्याचा विचार करुन कऱ्हाड तालुका सकल मराठा समाजाची काल तातडीची बैठक कऱ्हाडला झाली. त्यात जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांनी जी मागणी केली आहे.

ती सरकारकडून पूर्ण व्हावी यासाठी कऱ्हाड तालुका मराठा समाजाच्यावतीने तालुक्यामध्ये शांततेच्या मार्गाने बंद जाहीर करण्याचे ठरवण्यात आले. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असेही आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होती. आज सकाळी मराठा समाजाच्यावतीने दुचाकी रॅली काढून कऱ्हाड बंदचे आवाहन करण्यात आले. त्याचा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT