आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांनी मिळून १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे.
सातारा : मराठा समाजाला (Maratha Community) कुणबीचे दाखले देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांकडून कुणबीच्या नोंदींची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत १२ विभागांनी मिळून १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे. त्यातून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा ४० हजार ९०९ नोंदींचे पुरावे सापडले आहेत.
ज्या तालुक्यात कुणबी नोंदी सापडल्या आहेत, तेथे मराठा समाजाला दाखले वाटपही केले जात आहेत. कुणबीचे दाखले देण्यासाठी आवश्यक असलेल्या जुन्या नोंदी तपासण्याचे काम शासनस्तरावरून युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील १२ शासकीय विभाग आपापल्याकडील जुन्या दस्तावेजांच्या तपासण्या करून अशा नोंदींचा शोध घेत आहेत.
त्यासाठी तहसील कार्यालयापासून ते नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या जुन्या नोंदी, कारागृहातील जुन्या नोंदी, दस्त नोंदीतील जातीचा उल्लेख आदींची तपासणी होत आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांनी मिळून १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे. यामध्ये १९४८ ते १९६७ पर्यंतच्या सात लाख ९५ हजार, ८६५ नोंदींची तपासणी केली आहे.
१९४८ पूर्वीच्या ११ लाख २३ हजार ४५० नोंदींची तपासणी झाली आहे. यातून एकूण ४० हजार ९०९ कुणबी मराठा व मराठा कुणबी अशा नोंदींचे पुरावे सापडले आहेत. आता ज्या तालुक्यात असे पुरावे उपलब्ध झाले आहेत. तेथे दाखले देण्याचेही काम सुरू आहे.
नोंदी तपासणीचे काम यापुढेही सुरू राहणार आहे. आतापर्यंत सर्व विभागांनी १९ लाख १९ हजार ३१५ नोंदींची तपासणी केली आहे. पुरावे सापडले आहेत, त्या तालुक्यात दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-नागेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.