Maratha Reservation Village Ban for Political leaders in Satara esakal
सातारा

Maratha Reservation : वातावरण तापलं! चुलीत गेला पक्ष अन् चुलीत गेले नेते; साताऱ्यातील 'या' गावांत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय नेत्यांना गावांचे सीमोल्लंघन बंद होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

गावबंदीच्या ठिणगीचे ज्वालामुखीत रूपांतर होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करावी.

सातारा : अंतरवाली सराटीत (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांनी गावबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचे लोण उसळले आहे. दरम्यान, आज राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) जिल्ह्यातील प्रत्येक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याबरोबरच राजकीय नेत्यांचे फलकही गावात लावून देऊ नये, असे आवाहन केले आहे.

त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर राजकीय नेत्यांना गावांचे सीमोल्लंघन बंद होणार आहे. मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रतिसाद मिळत आहेत. सरकारने घेतलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी रविवारी (ता. २२) अंतरवाली सराटी राजकीय नेत्यांसाठी बंद करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय चक्री उपोषण तसेच गुरुवारी (ता. २६) कॅण्डल मार्च काढण्याचे आवाहन राज्यातील मराठा समाजाला केले आहे. जरांगे यांच्या आवाहनाचे पडसाद जिल्ह्यातही तीव्रपणे उमटू लागले आहेत. गावबंदीची जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ (ता. सातारा) येथे पडली. चुलीत गेला पक्ष व चुलीत गेले नेते अशा आशयाचे बॅनर गावातील चौकात लावण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य गावांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरले आहे.

आजवर जिल्ह्यातील किमान दहा गावांनी यात सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, उद्या जरांगे पाटलांनी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. तरीही राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत तातडीने कार्यवाही होताना दिसत नाही. राज्यकर्त्यांची ही उदासीनता लक्षात घेता राजधानी सातारा मराठा क्रांती मोर्चा पुढे आला आहे. त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले आहे.

गावबंदीच्या ठिणगीचे ज्वालामुखीत रूपांतर होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करावी. तसे फलक गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी लावावेत. कोणत्याही पक्षाचे तसेच नेत्याचे बॅनर गावात लावू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांबाबत तरुण वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने गावबंदीच्या ठिकाणी जाऊ नये, अन्यथा परिणामांना नेते जबाबदार असतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

साखळी उपोषणही...

मोरगिरी, नरळे (ता. पाटण), कातरखटाव, निमसोड (ता. खटाव), वहागाव, खोडशी, खुबी, ओंड (ता. कऱ्हाड), लिंब (ता. सातारा) या गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर फलटण व पाटणमध्ये साखळी उपोषणाची तयारी सुरू आहे. गावबंदीचे बॅनर मोफत देण्याचा निर्णय साताऱ्यातील पी. दत्ता, तर लोणंदमधील शिवमुद्रा फ्लेक्स आर्टस्‌ यांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT