Shambhuraj Desai esakal
सातारा

महाविकास आघाडी भक्कम, भाजपचं 'स्वप्न' होणार भंग

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : महाविकास आघाडीचे सरकार (Government of Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत. हे सरकार दीड वर्षे भक्कमपणाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याकडे ढकलण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) नेत्यांकडून सुरु आहे, हे बरोबर नाही, असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले. (Minister Shambhuraj Desai Criticizes BJP Leaders Satara Political News)

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) भाजपच्या नेत्यांनी (BJP leader) सुरु केलेल्या आंदोलनासंदर्भात गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे सर्वच नेते हे सरकार कोसळण्याचे स्वप्न बघत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार दीड वर्षे भक्कमपणाने कार्यरत आहे. केंद्र सरकारकडे असलेले विषय राज्याच्या गळी उतरवायचे काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सुरु आहे, हे बरोबर नाही.

जे विषय राज्याच्या आख्यारित आहेत ते राज्य करेल. मात्र, केंद्राचे विषय भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडून मार्गी लावून घ्यावे. आमदार विनायक मेटे यांच्या संरक्षणाबाबत मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्यासंदर्भात राज्यात एक समिती आहे. त्या समितीच्या अहवालानुसार लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यात येते. आमदार विनायक मेटे यांनी संरक्षण मुंबईत दिले गेले बाहेर दिले गेले नाही हा त्या समितीचा निर्णय आहे. आमदार मेटे यांना जर धोका आहे, असे समितीच्या निदर्शनास आले, तर संबंधित समितीच्या शिफारशीनुसार त्यांना तातडीने गृह विभागाकडून संरक्षण देण्यात येईल.

नरेंद्र पाटलांनी कायदा हातात घेवू नये

मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकारतर्फे जे करावे लागेल त्यासाठी महाविकास आघाडी सरकार तयार आहे. खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरला मूक आंदोलन केले. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना तातडीने चर्चेला बोलवले. त्यातील शासनस्तरावरील जे तातडीने मान्य करता येणे होते ते धोरण सरकारने घेतले आहे. मात्र, तरीही नरेंद्र पाटील हे हिंसक आंदोलन करणार असतील, तर कोणीही कायदा हातात घेवू नये. कायदा हातात घेवून कोणीही आंदोलन करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोणीही निर्माण करु नये, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी केले.

Minister Shambhuraj Desai Criticizes BJP Leaders Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT