Jayakumar Gore esakal
सातारा

..तर मी निवडणूक लढवणार नाही; भाजप आमदाराचं मोठं विधान

विशाल गुंजवटे

'भुरट्यांच्या नादाला लागून चुकीचे धंदे करू नका. आपल्या उंचीनं रहा.'

बिजवडी (सातारा) : जिहे-कटापूरच्या (Jihe-Katapur) पाण्याचं काय झालं, असं म्हणत.. लोधवड्याचा बेशरम गडी आमच्याच कामांचं भूमीपूजन करत सुटलाय. जिहे कटापूरच्या पाण्याचं त्यांनी फार टेन्शन घेऊ नये. याचा सर्व्हे पूर्ण झालाय अन् टेंडर निघून कामही सुरू झालंय. या भागाला आणायचं पाणी नेर तलावात सुटलंय, ते पाणी जून-जुलैपर्यंत आंधळीच्या धरणात येतंय. ते पाणी उचलून उत्तरेकडील वंचित गावांना आणणार आहे. आतापर्यंत या कामाला ४७५ कोटीच्या आसपास खर्च झालाय. ही योजना पूर्ण करत या योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत नेण्यासाठी अजूनही १ हजार कोटीचा निधी लागतोय. हा निधी राज्य शासन देणार नाही, त्यामुळं हा एकरकमी निधी आपण दोन अडीच महिन्यात केंद्रातून आणतोय. अन् हे पाणी या भागात आणून त्याचं भूमीपूजन करायलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आणणार असल्याचं प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी केले.

बिजवडी (ता. माण) येथे बिजवडी ते जगदाळेवस्ती (राजवडी ) १ कोटी ९४ लाख, बिजवडी ते लिंबखोरी (येळेवाडी) रस्ता १ कोटी ४० लाख, प्रजिमा ४७ ते दडसवाडा रस्ता २ कोटी १ लाख, महालक्ष्मी मंदिर सभामंडप ५ लाख आदी कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे ,माण पंचायत समितीच्या सभापती अपर्णा भोसले, माण तालुका कृषी बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख, उपसभापती वैशालीताई विरकर, माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सोमनाथ भोसले, सरपंच आप्पासोा अडागळे, सरपंच रोहिदास राऊत, सरपंच किरण बरकडे, सरपंच नीलेश दडस, उपसरपंच अरूण भोसले, माजी उपसरपंच संजय भोसले, माजी सभापती तुकाराम भोसले, विठ्ठलराव भोसले, दौलतराव जाधव, काकासोा शिंदे, नवनाथ शिंगाडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Jayakumar Gore

आमदार गोरे पुढे म्हणाले, बिजवडी-येळेवाडी रस्त्यासह इतर रस्त्याच्या कामासाठी या भागातली लोक माझ्याकडे येऊन रस्त्यांची मागणी करत होते. यासाठी आपण प्रयत्न करत होतो. ७ जून २०१९ ला या रस्त्याला मान्यता मिळालीय. त्यावेळी अजित पवार सत्तेत होते का अन् हे लोधवड्याच बेणं कुठं होतं अन् आता लहान पोरगं सांगतंय म्हणून या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करायला आले. त्यांना थोडीतरी लाज वाटयला हवी होती. त्या पोरानं ही आपली लायकी ओळखून वागावं व बोलावं. देशमुखांना माझा इशारा आहे. आपल्या आवाक्यात आहे, तेवढचं करा. भुरट्यांच्या नादाला लागून चुकीचे धंदे करू नका. आपल्या उंचीनं रहा मी बोललो तर तुम्हाला सहन होणार नाही. कोरोनाच्या काळात जनतेच्या सेवेसाठी या जयकुमारेशिवाय कोणी होत का? या देशमुखांना त्यांच्या मॅडमनी पुण्यातनं सोडलच नाही. तुम्हाला ८८ हजार लोकांनी मत दिली होती जीवघेण्या संकटात तुम्ही घरी बसला. अन् कोरोना कमी झाला की मग साहेब कुठल्यातरी एमआयडीसीचे किट घेऊन आले अन् ते वाटू लागले हे तुमचे जनतेविषयीचे प्रेम.

या भागातल्या गावांना पाणी पोहचवत नाही, तोपर्यंत हा जयकुमार थांबणार नाही. माणच्या नदीच्या पलीकडे जावून आणलेले पाणी पहा. आज माळरानावर ऊस पिकतोय. साखर कारखाने उभे राहिलेत. एमआयडीसीचे मोठ काम आपण करतोय. पायाभूत सुविधा निर्माण करणे, चांगले रस्ते करणे, शेतीला पाणी आणणे, सुबत्ता आणणे, जे पिकत त्याला बाजारपेठ निर्माण करून देणं हा अजेंडा घेऊन आपण काम करतोय. यापैकी विरोधकांकडे या ३२ गावांना पाणी आणण्यासाठी या रस्त्याच्या कामांना मंजुरी आणण्यासाठी कोणता अजेंडा होता का? लढाई करा, पण ती विकासकामांची करा. लबाड बोलून जातीपातीच राजकारण तर अजिबात करू नका. तुम्ही विकासकामांची स्पर्धा करत स्वत: आणलेल्या कामांचे भूमीपूजन करा, असाही टोला शेवटी त्यांनी देशमुखांना लगावला. प्रास्ताविक रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर यांनी केले. यावेळी अक्षयमहाराज भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. अमित भोसले यांनी आभार मानले.

जयकुमार नुसती हवा करत नाही, तर दिलेला शब्द पाळतो

बिजवडीचा एक मोठा नेता म्हणतोय की, या भागाचा जिहे कटापूरमध्ये सर्व्हेच नाही. त्याच्यासह विरोधकांनी कितीही आरोळ्या उठवूद्या. जिहे कटापूरचा सर्व्हेही झालाय अन् पाणीही येणार आणि ते पाणी माणच्या उत्तरेकडील भागात आपणच आणणार. पाणी न आणल्यास आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही हा शब्द जनतेला दिलाय. जयकुमार नुसती हवा करत नाही, तर दिलेला शब्द पाळतो. त्यामुळं निर्धास्त रहा. जिहे कटापूरचे पाणी या भागात आणून दाखवणारच, असंही आमदार म्हणाले.

एवढीच खुमखुमी साहेबांना असेल, तर त्यांना कामाची अर्धी यादी देतो

न केलेल्या कामाचे भूमीपूजन करण्यापेक्षा व दुसऱ्याच्या कामाचे भूमीपूजन करण्याची एवढीच खुमखुमी साहेबांना असेल तर...त्यांना माझ्या कामाची अर्धी यादी देतो. त्यांनी तिथे जावून कामाचे भूमीपूजन करावे. फक्त तिथं बोलावं की हे काम आमदारांचं आहे, पण मला दुसऱ्याच्या कामांचं भूमिपूजन करण्याची इच्छा आहे, म्हणून मी आलोय, असा टोलाही त्यांनी प्रभाकर देशमुखांना (Prabhakar Deshmukh) लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT