MLA Jaykumar Gore esakal
सातारा

माण विकास आघाडीला जबर धक्का; बेरजेच्या राजकारणात गोरेंची बाजी!

माण बाजार समितीत पक्षनिष्ठा, पॅनेल, नेतृत्व प्रतिष्ठेपेक्षा क्रॉस व्होटिंग व जात फॅक्टर ठरला महत्त्‍वाचा

रूपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Maan Taluka Agricultural Market Committee) राष्ट्रीय समाज पक्षाच्या (National Social Party) मदतीने झेंडा फडकविण्यात आमदार जयकुमार गोरेंना (MLA Jaykumar Gore) यश आले असून, पुन्हा एकदा बेरजेच्या राजकारणात आमदार गोरे यशस्वी ठरले. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील माण विकास आघाडीला अटतटीच्या लढतीत पराभवास सामोरे जावे लागले. तर शेखर गोरे यांचे अपयश मोठे असून, त्यांना आपल्या रणनीतीवर विचार करावा लागणार आहे. क्रॉस व्होटिंग व जात फॅक्टर तसेच लक्ष्मी दर्शन या निवडणुकीत महत्त्‍वाचे मुद्दे ठरले. पक्षनिष्ठा, पॅनेल व नेतृत्वाची प्रतिष्ठा दुय्यम ठरली.

बाजार समितीची मागील पंचवार्षिक निवडणूक आमदार गोरे व अनिल देसाई विरुध्द शेखर गोरेप्रणित राष्ट्रवादी पॅनेल अशी झाली होती.

बाजार समितीची मागील पंचवार्षिक निवडणूक आमदार गोरे व अनिल देसाई विरुध्द शेखर गोरेप्रणित राष्ट्रवादी पॅनेल अशी झाली होती. या निवडणुकीत दोन्ही पॅनेलनी प्रत्येकी नऊ जागा जिंकल्या होत्या. चिठ्ठीत आमदार गोरे व देसाई पॅनेलला सत्ता मिळाली होती. या वेळी निवडणुकीची संपूर्ण गणिते बदलली. आमदार गोरे यांनी रासपशी युती केली. श्री. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने काँग्रेस (Nationalist Congress Party) व अनिल देसाई गटाशी आघाडी केली. तर शेखर गोरे यांनी स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

निकालानंतर मतदानावर नजर टाकली असता असे दिसून येतेय की, रासपशी युती करणे आमदार गोरे गटाला फायदेशीर ठरले व पुन्हा एकदा सत्ता मिळाली. आघाडीचे प्रयत्न अपुरे पडले तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय शेखर गोरे यांच्या अंगलट आला. आमदार गोरे यांच्या भाजपच्या सहा, पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या रासपच्या चार जागा निवडून आल्या. राष्ट्रवादीला सहा तर काँग्रेसला एक जागा मिळाली. देसाई गटाचा एकही उमेदवार जिंकला नाही. शेखर गोरे पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाले. तसेच जात फॅक्टरसुध्दा महत्त्‍वाचा ठरलेला दिसून आला. महत्त्वाचे म्हणजे निवडून आलेल्या १७ पैकी तब्बल पाच उमेदवार धनगर समाजाचे आहेत. जात फॅक्टरमुळे आघाडीसाठी मजबूत समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मतदारसंघात आर्थिक दुर्बल प्रवर्गात शहाजी बाबर यांना फक्त ११ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अपक्ष उमेदवाराचा फटका बसल्याने ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गात पराभवाला सामोरे जावे लागले. तर व्यापारी मतदारसंघात आघाडीचे विजयी उमेदवार किसन सावंत यांना १९५ मते मिळाली. मात्र, आघाडीच्याच कैलास भोरे यांना केवळ १४३ मते मिळाल्याने त्यांचा दहा मतांनी पराभव झाला.

या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात डंगिरेवाडीचे नेते हरिश्चंद्र जगदाळे तसेच दुसऱ्यांदा निवडणुकीत उभे असलेले बिदालचे बाळासाहेब जगदाळे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. मागील वेळी व्यापारी मतदारसंघातून दोन मताने पराभूत झालेल्या शेखर गांधी यांनी यावेळी विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष बाळासाहेब काळे तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांचे चिरंजीव व बिजवडीचे विद्यमान उपसरपंच योगेश भोसले तसेच पुकळेवाडीचे उपसरपंच ब्रह्मदेव पुकळे यांनी महत्त्‍वपूर्ण विजय मिळविला.

रासप ‘किंगमेकर’च्या भूमिकेत

आमदार गोरे यांच्यासोबत निवडणूक लढवून प्रथमच सत्तेत आलेला रासप सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. श्री. देशमुख यांनी तगडी प्रचारयंत्रणा राबविली. मात्र, प्रकृती अस्वास्थ्‍यातेमुळे अनिल देसाई यांच्या अनुपस्थितीचा आघाडीला फटका बसला. शेखर गोरे यांनी ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून फक्त सोसायटी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. आपलं नक्की काय चुकतंय, याचा त्यांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT