Jayakumar Gore vs NCP esakal
सातारा

आमच्यावर ठासून अन्याय केला, आता तेवढाच मोठा आगडोंब उसळणार; भाजप आमदाराचा राष्ट्रवादीला इशारा

'आमच्या विरोधात षडयंत्रे रचताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना घरगडी म्हणून वागवलं.'

सकाळ डिजिटल टीम

'आमच्या विरोधात षडयंत्रे रचताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना घरगडी म्हणून वागवलं.'

बिजवडी (सातारा) : मागील सरकारच्या कार्यकाळात भाजप (BJP) कार्यकर्त्यांवर खूप अन्याय करण्यात आला. माझ्यावरील अन्यायाची तर परिसीमा गाठली होती. आपल्यावरील अन्यायाची मोठी उधारी शिल्लक आहे. सर्व उधारी व्याजासह परत करणार आहे. आता भाजपचे सरकार (BJP Government) आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावीच लागेल, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त बावधन इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार मदन भोसले, युवती जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, भाजप युवा उपाध्यक्ष तेजस जमदाडे, सरचिटणीस यशराज भोसले, दीपक ननावरे, अथर्व पाटील, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सागर पवार, श्रीरंग दिवेकर, विक्रम शिंदे, केशव सूर्यवंशी, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा दीपाली पिसाळ, मनीषा घैसास, सयाजी पिसाळ, सचिन पाटील, सुनील कदम, प्रदीप भोसले, तुषार पिसाळ, विजय रासकर, संतोष ननावरे, संपत राजपुरे,अजित जायकर, रामदास गायकवाड, लालसिंग जमदाडे आदी उपस्थित होते.

130 कोटी जनतेला मोफत लशींचे डोस

आमदार गोरे म्हणाले,‘‘केंद्राच्या पंतप्रधान आवास, आयुष्यमान भारत, पंतप्रधान गरीब कल्याण, किसान सन्मान, मुद्रा, स्वच्छ भारत, उज्ज्वला योजना, जल ही जीवन अभियान या योजनेतून जनतेला फायदा होत आहे. कोरोना काळात मोदींनी ५५ हजार व्हेंटेलेटर्स राज्याला दिले. १३० कोटी जनतेला मोफत लशींचे डोस दिले. लॉकडाउन काळात शेतकरी, माता आणि भगिनींना आर्थिक मदत आणि मोफत अन्नधान्य दिले. लाखो बाधितांवर मोफत उपचार केले. ’’ मदन भोसले यांनी भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली. वाई तालुक्यातील जनता आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच उपलब्ध राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

षडयंत्रे रचून आमच्यावर मोठा अन्याय

आमच्या विरोधात षडयंत्रे रचताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना घरगडी म्हणून वागवले. अन्याय करण्याची परिसीमा गाठली. मात्र, आता त्याचा बदला घेतला जाणार आहे. सुरुंगाची दारू जेवढी ठासून भरली जाते, तेवढा मोठा स्फोट होतो. आमच्यावर ठासून अन्याय केला गेला. आता तेवढाच मोठा आगडोंब उसळणार असल्याचा इशारा आमदार गोरे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT