MLA Jaykumar Gore esakal
सातारा

'जोपर्यंत आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

दहिवडी (सातारा) : जोपर्यंत मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation), ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation), मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही. तसेच मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झालेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करावे या मागणीसाठी आज दहीवडी येथील फलटण चौकात आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माण तालुका भाजपा पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले, त्यावेळी ते बोलत होते. (MLA Jaykumar Gore Criticizes Thackeray Government Over OBC And Maratha Reservation Satara Political News)

सरकार फक्त खायचं काम करत असून देत मात्र काहीच नाही. सरकारमधील छगन भुजबळांसारखे ओबीसी मंत्री आता आंदोलन करायची नौटंकी करत आहेत.

या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, राजाराम बोराटे, लिंगराज साखरे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे, काकासाहेब शिंदे, ॲड. दत्तात्रेय हांगे, दिगंबर राजगे, नवनाथ शिंगाडे, आप्पासाहेब पुकळे, रवी काटकर, अजित दडस, सदाशिव सावंत आदी प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, बेशरम राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. मराठा समाज प्रचंड बैचेन आहे. सर्वच समाजात असुरक्षिता निर्माण झाली आहे. सरकार फक्त खायचं काम करत असून देत मात्र काहीच नाही. सरकारमधील छगन भुजबळांसारखे (Minister Chhagan Bhujbal) ओबीसी मंत्री आता आंदोलन करायची नौटंकी करत आहेत.

हिम्मत असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करावे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला हजारोंचा समुदाय चालतो, मात्र आपल्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या ओबीसी समाजाची दडपशाहीने मुस्कटदाबी केली जात आहे. सरकार जास्त दिवस हा आवाज दाबू शकणार नाही. कारण या सरकारची घटका आता भरत आलेली आहे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणूका सरकारने घेवू नयेत. अधिवेशनाचा कालखंड वाढवून मराठा, ओबीसी आरक्षणावर चर्चा करावी अशी मागणी आमदार गोरे यांनी केली. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तर धनगर बांधवांनी ढोल, लेझीमच्या तालावर गजी नृत्य करुन आंदोलनात सहभाग नोंदवला.

OBC Reservation

पोलिसांनीच केला चक्काजाम

भाजपच्या आजच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी आणि परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ (Assistant Inspector of Police Rajkumar Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीडशे पोलिस तैनात करण्यात आले होते. म्हसवड, गोंदवले, मार्डी, पिंगळी फाटा, बिदालसह सर्वच बाजूंनी येणाऱ्या रस्त्यावर अडथळे लावून वाहने व आंदोलनकर्त्यांना अडविण्यात आले होते. त्यातच आज संचारबंदी असल्यामुळे आंदोलनस्थळी मोजकेच कार्यकर्ते पोहचू शकले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांनीच केला चक्काजाम अशी चर्चा रंगली होती.

OBC Political Reservation

ओबीसी मंत्र्यांनी आधी मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत अन् नंतर आंदोलनावर बोलावं

वडूज : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम रहावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खटाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आघाडी शासनातील ओबीसी मंत्र्यांनी अगोदर आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे द्यावेत अन् नंतर आंदोलनावर बोलावे, असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला. आंदोलनात तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, शिवाजी शिंदे, नगरसेवक अनिल माळी, वचन शहा, संजय काळे, जयवंत पाटील, काकासाहेब बनसोडे, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, विशाल बागल, रामभाऊ पाटील, प्रा. अजय शेटे, सोमनाथ जाधव, सदाशिव खाडे, रविंद्र राऊत, अर्जुन खाडे आदी उपस्थित होते.

Bharatiya Janata Party

आमदार गोरे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी शासनाने ओबीसी जनगणनेसंदर्भात योग्य कार्यवाही केली नसल्यानेच ओबीसींना आरक्षणाचा फटका बसला आहे. मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आरक्षणासंदर्भात भाजपा केंद्र शासनाकडे बोट दाखवित आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यांनी अगोदर पदाचे राजीनामे देऊन ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे. मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, राज्य शासनाने आरक्षण पुनर्स्थापित करावे अशा विविध मागण्यांसाठी भाजपाच्यावतीने राज्यस्तरीय आंदोलन छेडले आहे. यावेळी डॉ. माने, अनिल माळी, प्रा. शेटे आदींची भाषणे झाली. धनंजय चव्हाण यांनी आभार मानले. आंदोलनात डांभेवाडीचे सरपंच किशोर बागल, संतोष जाधव, बाळासाहेब चव्हाण, विवेक येवले, रविंद्र पेठे, अशोक काळे, हेमंत जाधव, चंद्रकांत कोकाटे, श्री. डोंगरे, सोमनाथ बुधे, इकबाल शेख, संजय कुंभार, किरण काळे, संजय अंबिके, अरूणराव यादव, विशाल महामुनी, संदीप दळवी, शिवाजी दुबळे, श्री. खाडे, लोहार, रायबोळे आदी उपस्थित होते. दरम्यान, निवासी नायब तहसीलदार सिताकांत शिर्के यांना निवेदन देण्यात आले.

MLA Jaykumar Gore Criticizes Thackeray Government Over OBC And Maratha Reservation Satara Political News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT