बिहार, झारखंड व ओरिसा या राज्यातील दुरुस्त्या करून तेथील धनगर समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळाले, त्यासाठी शासनाने अभ्यास समिती नेमली आहे.
लोणंद : धनगर समाजाला (Dhangar Community) एसटी आरक्षण (ST Reservation) मिळावे, धनगड ऐवजी धनगर असा शब्दबदल करावा. आरक्षण मिळेपर्यंत विविध प्रकारच्या सवलती या समाजाला मिळाव्यात. यासाठी विधिमंडळाच्या सभागृहात सातत्याने आवाज उठवला आहे. बिहार, झारखंड व ओरिसा या राज्यातील दुरुस्त्या करून तेथील धनगर समाजाला कशा पद्धतीने आरक्षण मिळाले, त्यासाठी शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. मात्र, या समाजाचा एक साथीदार म्हणून धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून लढण्याचे आश्वासन आमदार जयकुमार गोरे यांनी दिले.
खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने गणेश केसकर यांनी (ता. १६) पासून लोणंद नगरपंचायतीसमोर (Lonand Nagar Panchayat) बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाच्या आज (ता. २२) सातव्या दिवशी आमदार श्री. गोरे (Jaykumar Gore) यांनी उपोषणस्थळी येऊन केसकर यांना पाठिंबा दिला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी माजी सभापती रमेश धायगुडे- पाटील, बाजार समितीचे सभापती प्रा. सुनील शेळके, हणमंतराव शेळके, राज्य क्रांती शौर्यसेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे, डॉ. वाघमोडे, हर्षवर्धन शेळके- पाटील, सुजाता दगडे, डॉ. वसंतराव दगडे, डॉ. दीपक गोरड, संदीप शेळके, विजय धायगुडे, दादासाहेब शेळके, सत्त्वशील शेळके, हिरालाल धायगुडे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज येथे घंटानाद आंदोलनही करण्यात आले. त्या वेळी रामदास कांबळे व हर्षवर्धन शेळके - पाटील यांनी शासनाचा निषेध केला. यावेळी रमेश धायगुडे -घाटील, अशोक शेळके, अनिल कुदळे, सुनील यादव, हिरालाल धायगुडे, दादासाहेब धायगुडे, दत्तात्रय ठोंबरे, चंद्रकांत शेळके, धुळाजी कराडे, विक्रम धायगुडे, हेमंत पवार, संतोष मुसळे आदी उपस्थित होते. दरम्यान, आज विविध संस्था, संघटना व नागरिकांनी केसकर यांना पाठिंबा दर्शवला. लोणंद मेडिकल असोसिएशनच्या वतीनेही श्री. केसकर यांना पाठिंबा देण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अवधूत किकले, डॉ. नितीन सावंत, डॉ. अनिलराजे निंबाळकर, डॉ. मकरंद डोंबाळे, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. सुधीर धायगुडे, डॉ. मिलिंद काकडे, डॉ. अविनाश शेळके, डॉ. गणेश दाणी, डॉ. दिलीप येळे, डॉ. नीलेश सरक, डॉ. शहा, डॉ. अमर शिंदे, डॉ. धायगुडे, इंजिनिअर्स असोसिएशनचे विक्रम शेंडे, मुकेश कोळेकर, अशोक गायकवाड व त्यांचे सहकारी, क्रांती शौर्यसेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे व डॉ. वाघमोडे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुजाता दगडे व डॉ. वसंत दगडे, डॉ. दीपक गोरड, लोणंद ज्येष्ठ नागरिक संघाचे मालोजीराव जाधव आदी उपस्थित होते.
खंडाळा तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आज (ता. २३) शहरातून बहुजन आरक्षण बचाव भव्य रॅली काढून गणेश केसकर यांना पाठिंबा दर्शविण्यात येणार आहे. येथील अहिल्यादेवी स्मारकांपासून सकाळी १० वाजता या रॅलीस प्रारंभ होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.