जयकुमार गोरे प्रणित सभासद, सेवक परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकून संस्थेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
दहिवडी : ‘परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम’ राबवत आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था (Siddhanath Patsanstha Election) मर्यादित दहिवडी ही संस्था ताब्यात घेतली. विद्यमान अध्यक्ष सुनील पोळ यांची नियोजनातील ढिलाई पॅनेलला पराभवाच्या खाईत लोटणारी ठरली.
सिद्धनाथ पतसंस्था ही विविध पुरस्कारांनी सन्मानित ५०० कोटी व्यवसाय करणारी संस्था. मोठ्या प्रमाणात स्थावर, कर्मचाऱ्यांना चांगला पगार, सभासद व ठेवीदारांचा विश्वास कमावलेली संस्था म्हणून या पतसंस्थेची ओळख आहे. मात्र, संस्थापक अध्यक्ष वाघोजीराव पोळ यांच्या निधनानंतर संस्थेतील कर्मचारी व अध्यक्ष सुनील पोळ यांच्यात बेबनाव उफाळून आला.
हा बेबनाव पुढे वाढतच गेला. त्यातच आर्थिक अफरातफरीच्या आरोपांमुळे सुनील पोळ यांना परागंदा होऊन कायदेशीर लढाई लढावी लागली. हे सुरू असतानाच संचालक मंडळाची निवडणूक लागली. अध्यक्ष सुनील पोळ यांच्याविरोधात बहुतांशी कर्मचारी मैदानात उतरले. त्यांना आमदार जयकुमार गोरे यांच्या खमक्या नेतृत्वाची साथ मिळाली, तसेच शेखर गोरे यांचा एक उमेदवार व रासपचे मामूशेठ वीरकर हे सुद्धा त्यांच्या सोबतीला आले.
आमदार जयकुमार गोरे व त्यांचे सर्व सहकारी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच, या इराद्याने मैदानात उतरले होते. आखलेली रणनीती यशस्वी ठरली, तर सुनील पोळ यांच्या प्रचारात समन्वय, नियोजनाचा अभाव होता. त्यामुळे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, प्रभाकर देशमुख यांची साथ मिळूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.