वाई : वाई विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामांना १९ कोटी २२ लाख रुपयांचा निधी (Fund) मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. (Satara Marathi News)
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीनही तालुक्यांतील ग्रामीण भागात लोकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे, याकडे आमदार पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. काही गावांतील जुन्या योजना नादुरुस्त तर काही गावांत अतिवृष्टीने मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे नव्याने नळ पाणीपुरवठा योजना सुरू करणे गरजेचे होते.
यामध्ये वाई तालुक्यातील पाचवड (१ कोटी २२ लाख), वडोली (२१ .४५ लाख), देगाव (२५ लाख), लोहारे (१८.११ लाख), रेणावळे (२५ लाख), पिराचीवाडी (१८ लाख), कणूर (२५ लाख), कोंढवली (२४ .१७ लाख), भिवडी (१६ .२० लाख), किरोंडे (२०.३० लाख), जोर (२५ लाख) , कवठे (विठ्ठलवाडी) (२०.३५ लाख) , खानापूर (२४.२५ लाख), पांडेवाडी (९ .७० लाख), भोगाव (११.९३ लाख), आसरे पानस (३.८८ लाख), खडकी (८ .१५ लाख), कळंभे (११.८७ लाख), सुरूर (२५ लाख), परतवडी (२३ .५० लाख).
खंडाळा तालुक्यातील पाडळी (१ कोटी १८ लाख), भाटघर (२४.२५ लाख ), बाळूपाटलाचीवाडी (२५ लाख), दापकेघर (२४.८८ लाख), गोळेगाव (१९ .२७ लाख), कण्हेरी (४३.६० लाख), देवघर (२१.६२ लाख), आसवली (३२.३९ लाख ), वाठार बुद्रुक (९१.२१ लाख), शिवाजीनगर (८४.१६ लाख), पिसाळवाडी (८७ लाख), मरीआईचीवाडी (५६ लाख), मिरजे (२२ लाख), बावकलवाडी (२४.९५ लाख), घाटदरे (६३.९८ लाख), वाण्याचीवाडी (२४ .१७ लाख), अतिट (जाधव वस्ती) (२४ .३० लाख), झगलवाडी (२५ लाख), घाडगेवाडी (५० लाख) मंजूर केले.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार (१ कोटी ९९ लाख), आंब्रळ (२३.२४ लाख ), देवळी (३६.३९ लाख), रुळे (१९.७३ लाख), रेणोशी (१०.२१ लाख), सालोशी (८.०५ लाख ), देवसरे-मजरेवाडीला (११.४३ ), राजपुरी (४६.४३ लाख), कुमठे (२३.२४ लाख), खिंगर (६८ लाख), घावरी (२४.९६ लाख), येर्णे बु. (१८.२० लाख) , येर्णे खुर्द (४.८६ लाख), सौंदरी (२३.३६ लाख), हरचंदी (१३.२० लाख), वेळापूर (१३ .१० लाख), आकल्पे (२१.३० लाख), चकदेव (४.८६ लाख), घोणसपूर (५.७३ लाख), हातलोट (६.१० लाख) मंजूर करण्यात आले आहेत.
इतर गावांतील ही योजना लवकरच मंजूर होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. मंजूर झालेल्या योजनांची कामे अल्पावतीच मार्गी लागणार असल्याने लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.