कलेढोण (जि. सातारा) : एरव्ही सर्वसामान्य माणसाला आमदारांचे कौतुक तर असतेच. त्याचा रुबाब, बडेजाव हे पाहून सर्वसामान्य माणूसही अवाक् होतो. मात्र, तोच आमदार जर एखाद्या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला येवून स्वत: काट्यात गेलेली गाडी बाहेर काढण्यासाठी वाहन ढकलत असेल, तर नवलच वाटायला नको. खटाव-माणच्या सरहद्दीवर जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काल दहिवडीतील काटकर या अपघातग्रस्त शेतकऱ्याला मोलाची मदत केली. ती करताना उपस्थितांना 'दादा, जरा सांभाळून' म्हणताच, त्यांनी दादा, मला
याची सवय आहे म्हणताच, उपस्थिती शेतकऱ्यांच्या मनातही आमदारांनी जागा केली.
जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी चुणूक माण-खटावच्या दुष्काळी तालुक्यातील मांडवे (ता. खटाव) येथे दिसून आली. खटाव-माण तालुक्याच्या सरहद्दीवर दहिवडी (ता. माण) येथील दामोदर काटकर या शेतकऱ्याच्या व्हॅनला अपघात होवून त्यांची गाडी रस्त्यावरुन खाली जावून काट्यात गेली. यात काटकर हे जखमी झाले. याच मार्गावरुन जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार व त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि मातोश्री सुनंदाताई पवार हे कराड येथील नातेवाईकांना भेटून वडूज-दहिवडी मार्गे गोंदवले येथे निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत वडूजचे छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे व शेखर जाधव, मुन्ना मुल्ला प्रवास करत होते.
हा प्रकार आमदार रोहित पवार यांनी पाहताच गाडी थांबवत अपघातस्थळी धाव घेत, काटकर यांची चौकशी करत आधार दिला. या अपघातात काटकर यांना तोंडाला मार लागला आहे. मात्र, रस्ता सोडून काट्यात गेलेली गाडी उपस्थितांच्या मदतीने आमदार पवार यांनी ढकलत रस्त्यावर आणली. याचवेळी उपस्थितांनी 'रोहितदादा, जरा सांभाळून, म्हणताच आमदारांनी, अरे, मला याची सवय आहे असे म्हणताच, दुष्काळी जनतेच्या तरुण आमदारांविषयी मनात पाझर फुटला. एकीकडे सुटाबुटात, रुबाबात व बडेजाव करणारे आमदार आणि दुसऱ्या बाजूला हाताच्या शर्टाच्या बाह्या बाजूला मागे करत गाडीला ओढत रस्त्यावर आणणारे, आपुलीकीने शेतकऱ्याची चौकशी करणारे युवक आमदार पवार हे दुष्काळी जनतेच्या मनात घर करुन बसले आहेत. सोशल मीडियावर देखील या त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्या या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.