Shahaji Patil vs Jayant Patil esakal
सातारा

Shahaji Patil : राष्ट्रवादीनं अख्खी शिवसेना डबऱ्यात घालायचं ठरवलं होतं; शहाजीबापूंचा जयंत पाटलांवर प्रहार

'एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचवली म्हणून जयंत पाटलांचा जळफळाट होतोय.'

रुपेश कदम

'एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचवली म्हणून जयंत पाटलांचा जळफळाट होतोय.'

दहिवडी (सातारा) : भाजपनं (BJP) शिवसेना फोडून बेगडी राजकारण केलं असं म्हणण्याचा जयंत पाटलांना (Jayant Patil) कोणताही नैतिक अधिकार नसून राष्ट्रवादीनंच शिवसेना (Shiv Sena) अडचणीत आणली, असा स्पष्ट आरोप आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी केला.

विरकवाडी (ता. माण) इथं बैलगाडी शर्यतीच्या (Bullock Cart Race) बक्षीस वितरण प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. आमदार शहाजी पाटील म्हणाले, 'आमची व भाजपची युती नैसर्गिक होती. ही युती अडीच वर्षापूर्वीच मार्गी लागायला पाहिजे होती. परंतु, दुर्देवानं त्यावेळी ती मार्गी लागली नाही. याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आहे. भाजपनं शिवसेना फोडली म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनं अख्खी शिवसेना डबऱ्यात घालायचं ठरवलं होतं ते एकनाथ शिंदेंनी वाचवलं त्याचा जळफळाट जयंत पाटील यांना होतोय.'

शहाजीबापू पुढं म्हणाले, अमोल मिटकरी हे पात्र राजकारणात अतिशय नवं आहे. मला तर वाटतं मिटकरीनं संजय राऊत यांना गुरु मानलंय आणि त्यामुळं जे राऊतांचं झालं तेच एकदिवशी मिटकरीचं होणार, असा टोलाही त्यांनी मिटकरींना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT