MLA Shashikant Shinde esakal
सातारा

'बैलगाडी शर्यतीसाठी दोन दिवसांत शरद पवार, सुप्रिया सुळेंना भेटणार'

जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनास आमचा पाठिंबा : आमदार शिंदे

उमेश बांबरे

सातारा : तमिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटकाप्रमाणे (Karnataka) महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीला (Bullock Cart Race) परवानगी मिळावी, अशी बैलगाडी मालकांची मागणी आहे. आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोलिस अधीक्षकांना भेटून बैलगाडी मालकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार आहोत. येत्या दोन दिवसांत खासदार शरद पवार (Sharad Pawar) व खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचीही भेट घेणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तमिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटकाप्रमाणे (Karnataka) महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीला (Bullock Cart Race) परवानगी मिळावी.

ते पुढे म्हणाले, पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची विनंती करणार असून खेळ व स्पर्धेची नियमावली व निकषाच्या आधारे बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनास आमचा पाठिंबा राहील, असे स्पष्ट मतही शिंदे यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर ७ मे २०१४ पासून बंदी घातली आहे. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी बैलगाडी शर्यतीची परंपरा सुमारे ४०० वर्षांपासून जुनी आहे. ग्रामीण भागात देव-देवतांच्या यात्रांमध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजिण्याची परंपरा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्याचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला होतो. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांनी बैलगाडी शर्यतीबाबत स्वतंत्र कायदा केला आहे. याच धर्तीवर बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने तुमची अडचण होते का?, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीत सगळे एकत्र असल्याने थोडी अडचण होते. पण, सगळे सांभाळून घेऊन वाटचाल करत आहोत. सध्या माझ्याकडील जबाबदाऱ्यांचा व्याप वाढल्याने सगळीकडे थोडे-थोडे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे कोरेगावकडे दुर्लक्ष होतेय असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT