Shashikant Shinde esakal
सातारा

Shashikant Shinde : कोरेगाव मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढणार; आमदार शशिकांत शिंदेंची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

‘‘विरोधकांनी सर्व आयुधांचा वापर केला. आमच्याकडे लोक होते; पण पैसे नव्हते. सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने होते. त्यातच पिपाणीने घोटाळा केला.''

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात (Koregaon Constituency) लोकशाहीविरोधात ठोकशाही अशी लढत असेल. काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच लढणार आहे. त्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करू नये, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी व्यक्त केले.

दरम्यान, कऱ्हाड दक्षिण व उत्तरमध्ये विरोधकांनी मते विकत घेतली होती. त्यामुळे माझा हा तांत्रिक पराभव आहे. आता यावेळेस लोकांनी ही निवडणूक हाती घेतली असून, यावेळेस इतिहास घडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोरेगाव मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमावर आमदार शशिकांत शिंदेंनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी कोरेगावात शिंदे विरुद्ध शिंदे अशीच लढत पाहायला मिळणार का, या प्रश्नावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘कोरेगाव मतदारसंघात लोकशाहीविरोधात ठोकशाही अशी लढत असेल. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघातून मी लढणार असून, विरोधकांनी त्याची काळजी करू नये.’’

लोकसभेतील पराभवावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘विरोधकांनी सर्व आयुधांचा वापर केला. आमच्याकडे लोक होते; पण पैसे नव्हते. सर्वसामान्य लोक आमच्या बाजूने होते. त्यातच पिपाणीने घोटाळा केला. कऱ्हाड दक्षिण व उत्तरमध्ये विरोधकांनी मते विकत घेतली. त्यामुळे माझा हा तांत्रिक पराभव आहे. आता यावेळेस लोकांनी ही निवडणूक हाती घेतली असून, यावेळेस इतिहास घडेल.’’

टोलबंद आंदोलनात सहभागी होणार

काँग्रेसने जिल्ह्यात महामार्गावरील दुरवस्थेचा मुद्दा उचलून धरून येत्या शनिवारी टोल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सहभागी होणार का, यावर शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही आंदोलनात सहभागी होण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून यामध्ये सर्व जण सहभागी होणार आहोत.’’

आरक्षणाची केंद्राने भूमिका घ्यावी

मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणाबाबत सर्वपक्षीय लोकांना बोलावून एकत्र बसवून निर्णय घेणे आवश्यक आहे. मुळात हे सर्व केंद्राच्या हातात असूनही त्यांना कुठल्याही जातीनिहाय आरक्षणाविषयी निर्णय घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांनीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT