उदयनराजेंबाबत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेणार आहेत.
सातारा : साताऱ्यात जे काय होतंय, ते सर्व उदयनराजेंमुळे होतं. मध्यंतरी साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता. तो सुद्धा त्यांनीच टिचकी वाजवून सुरू केला आहे, असा टोला लगावून आम्हाला ॲक्टींग येत नाही. आम्ही त्यांच्यासारखे अॅक्टींग स्कूलमधून आलेलो नाही, अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी उदयनराजेंच्या (MP Udayanraje Bhosale) टिचकीच्या ॲक्शनची खिल्ली उडवली. दरम्यान, त्यांना पॅनेलमध्ये घेण्याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), खासदार शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेणार आहेत. त्यांनी यांच्याशी बोलून घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला त्यांच्याच शैलीत शिवेंद्रसिंहराजे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Satara Bank Election) चौकशी लागलेली नाही. कदाचित, उदयनराजेंना माहित नसावे. कारण ते बँकेत येत नाहीत. पण, आता निवडणूक लागल्याने ते बँकेत येऊ लागले आहेत. जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Factory) दिलेल्या कर्जाची माहिती ईडीने मागवली होती. ती आम्ही दिलेली आहे. जिल्हा बँकेने जरंडेश्वर कारखान्याकडील सर्व कागदपत्रे तपासून हे कर्ज दिले आहे. सध्या जरंडेश्वरचे सर्व हप्ते नियमित परत येत आहेत.’’
उदयनराजे जिल्हा बँकेवर का आरोप करत आहेत, याविषयी विचारले असता ते म्हणाले,‘‘ मला याची माहिती नाही. मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी बँकेसह संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतूक केले होते. याबाबत काही वृत्तवाहिन्यांवर बातम्याही आल्या होत्या.’’ उदयनराजेंना पॅनेलमध्ये का घेतले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले,‘‘ मला याची माहित नाही. त्यांना पॅनेलमध्ये घेणारा मी कोण, मुळात मीच पॅनेलमध्ये आहे का नाही, हे स्पष्ट झाले नाही. त्यांच्याबाबतीत सभापती रामराजे निंबाळकर, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार आहेत. त्यांनी यांच्याशी बोलून घ्यावे.’’
साताऱ्यात जे काय होते ते सर्व उदयनराजेंमुळे होते, असा टोला मारतानाच शिवेंद्रसिंहराजे म्हणाले,‘‘ साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता. तोही त्यांनीच टिचकी वाजवून सुरू केला आहे.’’ तुम्ही त्यांची ॲक्टींग करताय काय, असे विचारले असता शिवेंद्रसिंहराजे यांनी आम्हाला ॲक्टींग येत नाही. आम्ही त्यांच्यासारखे अॅक्टींग स्कुलमधून आलेलो नाही, असे स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.