बॅंकेच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वाधिक मते असलेले सातारा तालुक्याचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी आपण सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभागी होणार असल्याबद्दल त्यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. या सर्वांनी आमची निष्ठा सुरुचीवर (Suruchi Bungalow) असून, तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असा शब्द दिला आहे. येत्या 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा जिल्हा बॅंकेच्या तालुक्यातील सर्व मतदारांसोबत बैठक घेऊन आगामी रणनीती शिवेंद्रसिंहराजे ठरविणार आहेत.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी गोपनीय बैठका सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेऊ लागला आहे. त्या पध्दतीनेच सातारा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मतेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच बैठक घेऊन जाणून घेतली. या बैठकीस सातारा तालुका, सातारा पालिकेचे नगरसेवक व पदाधिकारी, कोरेगाव व कऱ्हाड उत्तर मतदारसंघात समाविष्ट झालेल्या सातारा तालुक्यातील गावांतील आमदार समर्थक उपस्थित होते. जिल्हा बॅंकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) सर्वसमावेशक करणार आहे. त्यासाठी सर्वाधिक मते असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
त्यानुसार सर्वांनी आमची निष्ठा सुरुचीवरच असून, तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असा शब्द या सर्वांनी त्यांना दिला आहे. आता आगामी १७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा सातारा तालुक्यातील जिल्हा बॅंकेच्या मतदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये मतदारांचेही म्हणणे शिवेंद्रसिंहराजे जाणून घेणार आहेत. त्यामुळे सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) व राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार (NCP leader Deepak Pawar) यांनी शिवेंद्रसिंहराजेंविरोधात कोणतीही चाल चालली तरी आमदारांनी आधीच रणनीती ठरवून सर्वांपुढे आपली भूमिका मांडल्याने या सर्व चाली फोल ठरणार आहेत.
शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे अनेकजण इच्छुक
सातारा तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्यांपैकी अनेकजण जिल्हा बॅंकेत विविध मतदारसंघांतून इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंना किती जागा राष्ट्रवादीकडून मिळणार, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. खरेदी-विक्री संघ, गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था तसेच मजूर व पाणीपुरवठा संस्था, तसेच महिला राखीव व ओबीसी या मतदारसंघांसाठी सातारा तालुक्यातून इच्छुक अधिक असल्याने त्यांना कसे सामावून घेणार, हा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.